ठाण्यात सुनेने सासूला फटके मारून नेले फरफटत, मारहाणीची व्हिडीओ क्लिप व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 02:32 PM2023-10-11T14:32:20+5:302023-10-11T14:33:04+5:30

सासूला फटके मारून सुनेने फरफटत नेल्याची व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

In Thane, daughter-in-law beat up mother-in-law video clip of the beating went viral | ठाण्यात सुनेने सासूला फटके मारून नेले फरफटत, मारहाणीची व्हिडीओ क्लिप व्हायरल

ठाण्यात सुनेने सासूला फटके मारून नेले फरफटत, मारहाणीची व्हिडीओ क्लिप व्हायरल

ठाणे : कोपरीमध्ये ७७ वर्षीय ज्योती दयारामानी यांना ५३ वर्षीय सून काेमल  हिने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सुनेविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती कोपरी पोलिसांनी मंगळवारी दिली. सासूला फटके मारून सुनेने फरफटत नेल्याची व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

कोपरीतील नाखवा हायस्कूलजवळील सिद्धार्थनगरातील साईतीर्थ या उच्चभ्रू साेसायटीमध्ये हा संतापजनक  प्रकार घडला. तक्रारीमध्ये सासू ज्योती यांनी म्हटले आहे की, १४ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री आठच्या सुमारास त्या हॉलमधील सोफ्यावर बसलेल्या होत्या. त्या अशक्त असल्याचे माहिती असूनही त्यांची सून कोमल यांनी त्यांना बेदरकारपणे पकडून हाताने तोंडावर जोराने फटके मारले. 

खाली खेचून ओढून फरफटत नेले. त्यामुळे त्यांच्या पाठीला, कमरेला दुखापत झाली. त्यानंतर ३ ऑक्टाेबरला ज्योती या घरातील कॉमन वॉशरूम वापरण्यास गेल्या असता, कोमल यांनी त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर त्यांच्या हाताला पकडून जोरदार खेचून खाली पाडले. त्यांनी सासूला शिवीगाळ करून पोटात आणि पाठीवर बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच गळा दाबून घरातून जाण्याची धमकीही दिली. 

व्हिडीओ पाहून व्यक्त केला संताप
सुनेने सासूला मारहाण करीत असल्याचा तसेच घरातून बाहेर जाण्यासाठी धमकी दिली जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मंगळवारी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या घटनेविषयी संताप व्यक्त होत आहे.

 कोमल यांनी कोपरी पोलिस ठाण्यात ९ ऑक्टाेबरला तक्रार केली आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याचे एसीपी गजानन काब्दुले यांनी सांगितले. यातील आरोपी कोमल यांना नोटीस बजावली जाणार असून, न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याची माहिती कोपरी पोलिसांनी दिली.

 

Web Title: In Thane, daughter-in-law beat up mother-in-law video clip of the beating went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे