Thane: ठाण्यात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, म्हस्के यांच्या विरोधात टिप्पणी, भाजप पदाधिकाऱ्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 02:08 PM2023-04-22T14:08:11+5:302023-04-22T14:08:34+5:30

Thane: ठाण्याचे माजी महापौर तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणारे भाजपचे ठाणे शहर सचिव प्रमोद चव्हाण (४८) आणि गणेश दळवी (३८) या दोघांना कोपरी पोलिसांनी गुरुवारी अटक केली

In Thane, Shiv Sena-BJP workers made strong comments against Rada, Mhaske, BJP office bearers arrested | Thane: ठाण्यात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, म्हस्के यांच्या विरोधात टिप्पणी, भाजप पदाधिकाऱ्यांना अटक

Thane: ठाण्यात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, म्हस्के यांच्या विरोधात टिप्पणी, भाजप पदाधिकाऱ्यांना अटक

googlenewsNext

 ठाणे : ठाण्याचे माजी महापौर तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणारे भाजपचे ठाणे शहर सचिव प्रमोद चव्हाण (४८) आणि गणेश दळवी (३८) या दोघांना कोपरी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. या दोघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले. या प्रकरणावरून म्हस्के आणि चव्हाण या दोन्ही गटांमध्ये धुमश्चक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेना शिंदे गटाचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख संजय बच्छाव (४९) हे २० एप्रिलला रात्री त्यांच्या कोपरी येथील घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर आनंदनगर बोगद्याजवळ काही मित्रांसमवेत उभे होते. चव्हाण यांनी गाडी येथे उभी का करता, तुम्ही नाशिक जिल्ह्याचे मराठा संघटनेचे पद भूषवत असल्याने तुम्ही तुमच्या गाड्या नाशिकमध्येच उभ्या करा, असे बच्छाव यांना सुनावले, तर दळवी यांनीही जातीवाचक टिपणी करीत त्यांना  धक्का देत अपमानित केले. त्यापूर्वी प्रमोद चव्हाण यांनी त्यांच्या फेसबुकवर १९ एप्रिल २०१३ रोजी सायंकाळी ७:१३ वाजेच्या सुमारास माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या संदर्भात आक्षेपार्ह टिपणी केली होती.

कार्यालयावर हल्ला
बच्छाव यांनी कोपरी पोलिस ठाण्यात २० एप्रिल रोजी चव्हाण आणि दळवी या दोघांविरुद्ध अनुसूचित जाती आणि जमाती तसेच दोन गटांत तेढ निर्माण करणे, कलम १५३-अ आणि बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, या घटनेनंतर म्हस्के यांच्यासह त्यांच्या संतप्त समर्थकांनी चव्हाण यांच्या कार्यालयावर हल्ला केला. चव्हाण आणि दळवी या दोघांनाही पोलिसांनी अटक करून कारवाई केली.

साईनाथ मित्रमंडळाचा हा विषय होता. यात भाजप कार्यकत्यनि कोणतीही शिवीगाळ केलेली नाही. त्यामुळे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणे चुकीचे आहे. पोलिसांनी यात सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. मुळात चौकशीशिवाय अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणे अयोग्य आहे. - आ. निरंजन डावखरे, अध्यक्ष, भाजप ठाणे शहर

भाजपच्या एका कार्यकत्याने सोशल मीडियावर चुकीची पोस्ट टाकली होती. त्याने शिवीगाळही केली होती. शिवसेना पदाधिकायाविरुद्ध वारंवार आक्षेपार्ह पोस्ट टाकणे चुकीचे आहे. त्यासंदर्भात आता तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - नरेश म्हस्के, माजी महापौर, ठाणे

Web Title: In Thane, Shiv Sena-BJP workers made strong comments against Rada, Mhaske, BJP office bearers arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.