द बर्निंग कारचा थरार; आगीत चारचाकी वाहनाचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली
By अजित मांडके | Published: October 10, 2022 02:22 PM2022-10-10T14:22:52+5:302022-10-10T14:23:33+5:30
मुंबई-नाशिक महामार्गावरून चाललेल्या धावत्या चारचाकी वाहनाला आग लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मुंबई-नाशिक महामार्गावरून चाललेल्या धावत्या चारचाकी वाहनाला आग लागली. गाडीला आग लागल्याचे निर्दशनास येताच गाडीतील चालक शकील जाकिर खाटीक.(२५) आणि हमजा मुजार शेख. (२४) या दोघांनी गाडी बाजूला करून गाडीतून बाहेर धाव घेतली.
ते कल्याण येथील रहिवासी आहेत. या आगीत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ही घटना रविवारी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांच्या सुमारास दिवा अंजुर येथे घडली. मुंबई-नाशिक महामार्ग, द मुंबई ढाबा जवळ, मोदी होंडाई शोरूम समोर, अंजुर, दिवा येथे ठाण्यातून कल्याणकडे चाललेल्या धावत्या कारला आग लागल्याची माहिती मिळताच,घटनास्थळी नारपोली पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवानांनी धाव घेतली. ज्यावेळी कारला आग लागली त्यावेळी कारमधून दोघे प्रवास करत होते. त्या दोघांनी गाडीतून बाहेर धाव घेतली.
तर,घटनास्थळी पोहोचल्यावर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी चारचाकी वाहनाला लागलेली आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. पण, आगीत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"