ठाण्यात जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रशासनाविरोधात ठिय्या, प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन
By सुरेश लोखंडे | Published: February 27, 2023 05:23 PM2023-02-27T17:23:17+5:302023-02-27T17:24:31+5:30
ठाणे येथील जिल्हा परिषदेमधील पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशनच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सोमवारी एकत्र येत प्रलंबित मागण्यांसाठी प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन ...
ठाणे येथील जिल्हा परिषदेमधील पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशनच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सोमवारी एकत्र येत प्रलंबित मागण्यांसाठी प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन करून प्रशासनाला धारेवर धरले.
मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आज द्वारसभा घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधले. असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र जगे यांच्यासह पदाधिकारी सुभाष पाटील, रामचंद्र मडके, संजय कुलकर्णी, राजन मंडलिक, पुंडलिक पाटील, अरुणा देशपांडे, अनिता दिघे, प्रज्ञा हारळकर, आशा धनमेहेर, शांताराम मुकादम, अजय पाठक आदींनी या आंदोलनकर्त्यांचे नेतृत्व केले. कनिष्ठ सहायकांचे वेतन अदा करावे.
पूर्वी कर्मचाऱ्यांना मराठी किवा इंग्रजी भाषेतील असणे आवश्यक असताना दोन्ही टंकलेखन आवश्यक लाभ पुन्हा प्रदान करावेत. ज्यांचे लाभ रोखले आहेत, त्यांच्या निवृत्ती वेतनात सुधारणा करून सुधारित दराने ते देण्यात यावेत. सेवानिवृत्त वर्ग ३ आणि वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांच्या प्रकरणामध्ये चुकीची दुरुस्ती करावी. अतिप्रदानाची वसुली न करणे आदी मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. या प्रलंबित मागण्यावेळीच मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.