भिवंडीतील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी ४२, तर सदस्य पदासाठी ३१९ उमेदवार

By नितीन पंडित | Published: December 8, 2022 06:05 PM2022-12-08T18:05:48+5:302022-12-08T18:05:57+5:30

शिंदे गटाचे भिवंडी ग्रामीण विधानसभेचे आमदार शांताराम मोरे यांनी आपल्या मूळ गाव असलेल्या खानीवली ग्रामपंचायतीतील सरपंच पदासह सातही सदस्य बिनविरोध निवडल्याने गावावर आपली सत्ता अबाधित ठेवली आहे.

In the election of 14 Gram Panchayats in Bhiwandi, 42 candidates for the post of Sarpanch and 319 candidates for the post of member | भिवंडीतील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी ४२, तर सदस्य पदासाठी ३१९ उमेदवार

भिवंडीतील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी ४२, तर सदस्य पदासाठी ३१९ उमेदवार

Next

भिवंडी- भिवंडी तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यासाठी १८ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे.या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीस गुरुवार पासून खऱ्या अर्थाने सुरवात झाली असून गुरुवारी अर्ज माघारी घेण्याच्या मुदती नंतर एकूण १४४ ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीसाठी ३१९ तर थेट १४ सरपंच निवडीच्या निवडणुकीत ४२ उमेदवार रिंगणात उतरले असल्याने या निवडणुकीमध्ये चुरस वाढणार आहे. तर शिंदे गटाचे भिवंडी ग्रामीण विधानसभेचे आमदार शांताराम मोरे यांनी आपल्या मूळ गाव असलेल्या खानीवली ग्रामपंचायतीतील सरपंच पदासह सातही सदस्य बिनविरोध निवडल्याने गावावर आपली सत्ता अबाधित ठेवली आहे.

भिवंडी तालुक्यातील कोन,कारीवली,कांबे,कशेळी,कासणे,आमणे,कोपर,आवळे,दुगाड,कुहे,अकलोली,खालींग बुद्रुक, खनिवली,सापे अशा १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत.दरम्यान या निवडणुकीत कोनगावात भाजपा मध्ये बंडखोरी झाली असल्याने कोनगावच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तर कशेळी या गावावर शिवसेना शिंदे गटाचे देवानंद थळे यांच्या ताब्यात १५ वर्षांपासून असलेली ग्रामपंचायत पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेण्यासाठी सरपंच पदासाठी विद्यमान सरपंच असलेल्या पत्नी वैशाली देवानंद थळे या पुन्हा रिंगणात उतरल्या आहेत.

Web Title: In the election of 14 Gram Panchayats in Bhiwandi, 42 candidates for the post of Sarpanch and 319 candidates for the post of member

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.