वैद्यकीय चाचण्यांमध्ये 'ती' महिला गर्भवती नसल्याचा डॉक्टरांचा निर्वाळा

By अजित मांडके | Published: April 4, 2023 01:52 PM2023-04-04T13:52:22+5:302023-04-04T13:52:30+5:30

सध्या तिची प्रकृती स्थिर असून केवळ वैद्यकीय निगराणी खाली आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.

In the medical tests, the doctor confirmed that roshani shinde was not pregnant | वैद्यकीय चाचण्यांमध्ये 'ती' महिला गर्भवती नसल्याचा डॉक्टरांचा निर्वाळा

वैद्यकीय चाचण्यांमध्ये 'ती' महिला गर्भवती नसल्याचा डॉक्टरांचा निर्वाळा

googlenewsNext

ठाणे :  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवती सेना रोशनी शिंदे तिच्या कासरवडवली येथील ऑफिसमधुन सुटण्याच्या वेळी तिच्यावर शिंदे गटाच्या २० महिलांनी ऑफिस मध्ये घुसून हल्ला केला होता. त्यानंतर तिला उपचारासाठी सरळ येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. परंतु सदरची महिला ही गरोदर नसल्याचा दावा तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर उमेश आलेगावकर यांनी केला आहे. त्यासाठी तिची दोनदा गरोदर आहे की नाही, याची तपासणी करण्यात आली होती. ती टेस्ट दोनही वेळा निगेटिव्ह आढळली आहे. तसेच तिला मुका मार लागला असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या तिची प्रकृती स्थिर असून केवळ वैद्यकीय निगराणी खाली आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.
          
फेसबुक पोस्ट टाकण्यावरून ठाकरे गटातील महिला पदाधिकाऱ्याला रोशनी शिंदे हिला शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे. शोरूमच्या कार्यालयात जाऊन लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे. तसेच ती महिला पदाधिकारी गर्भवती असूनही तिला मारहाण करण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहेत. परंतु वैद्यकीय चाचण्यांमध्ये ती महिला गर्भवती नसल्याचे उघड झाले आहे. 

ठाण्यातील एक खासगी रुग्णालयात रोशनी यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयाचे डॉ. उमेश आलेगावकर यांनी मंगळवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधून तिच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती दिली. ही महिला गर्भवती असल्याची दोनदा चाचणी करण्यात आली असून या दोन्ही टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे. त्यामुळे ही महिला गरोदर गर्भवती नसल्याचे स्पष्ट झाले, असे डॉ आलेगावकर यांनी सांगितले. तसेच, तिला गंभीर इजा झालेली नसून तिला मुका मार लागलेला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या तिची प्रकृती स्थिर असून केवळ वैद्यकीय निगराणी खाली आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: In the medical tests, the doctor confirmed that roshani shinde was not pregnant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे