शेअर्स खरेदीच्या नावाखाली उल्हासनगरात महिलेची ४३ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक
By सदानंद नाईक | Published: July 14, 2024 06:02 PM2024-07-14T18:02:39+5:302024-07-14T18:03:13+5:30
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.
सदानंद नाईक, उल्हासनगर : जादा नफ्याचे आमिष दाखवून बनावट शेअर्सच्या अँपवरून ४३ लाख १० हजाराचे शेअर्स केल्याचे भासवून एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४, येथील अंबिकानगर येथे कविता राहुल मराठे ह्या राहतात. त्यांच्या मोबाईलवर १ मे ते १० जुलै दरम्यान प्रिया, अनिल शर्मा व एचएल प्लॅटफॉर्मचा कस्टमर केअर नंबरधारक याचा फोन येऊन शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्याचे व जादा नफ्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यांनी एचएल प्लॅटफॉर्म ह्या बनावट शेअर्स मार्केटचे बनावट अँपवर एक लिंक देऊन त्यावर शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. त्या लिंकवर मराठे यांनी तब्बल ४३ लाख १० हजार रुपयांची शेअर्स मध्ये गुंतवणूक केली. मात्र नफा मिळत नसल्याने, आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी विट्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगून टाकला. पोलिसांनी प्रिया, अर्जुन शर्मा व एचएल प्लॅटफॉर्म कस्टमर केअर नंबरधारका विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.