रेल्वेच्या बैठकीत मीरारोड व भाईंदर रेल्वे स्थानकातील समस्या दूर करून सुविधा देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 03:53 PM2023-03-02T15:53:09+5:302023-03-02T15:54:01+5:30

उन्हाळा पाहता दोन्ही स्थानकात प्रवाशांना थंडगार पाण्याचे कुलर बसवण्याचा आग्रह धरला. 

In the railway meeting, the problem of Miraroad and Bhayander railway stations is resolved and facilities are demanded | रेल्वेच्या बैठकीत मीरारोड व भाईंदर रेल्वे स्थानकातील समस्या दूर करून सुविधा देण्याची मागणी

रेल्वेच्या बैठकीत मीरारोड व भाईंदर रेल्वे स्थानकातील समस्या दूर करून सुविधा देण्याची मागणी

googlenewsNext

मीरारोड - पश्चिम रेल्वेचे महाव्यासवथापक अशोककुमार मिश्रा यांनी मीरारोड व भाईंदर रेल्वे स्थानकबाबत बोलावलेल्या बैठकीत खासरदार राजन विचारे यांनी कामांचा आढावा घेत विविध समस्या सोडवण्याची व प्रवाशाना सुविधा देण्यासाठीची यादी सादर केली. उन्हाळा पाहता दोन्ही स्थानकात प्रवाशांना थंडगार पाण्याचे कुलर बसवण्याचा आग्रह त्यांनी धरला. 

पश्चिम रेल्वेने लोकसभा अधिवेशनच्या आधी खासदार राजन विचारे यांची रेल्वेबाबत बैठक बुधवारी आयोजित केले होती. बैठकीला मुख्य रेल्वे प्रबंधक नीरज वर्मा सह रेल्वे संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रेल्वेच्या ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेसाठी भाईंदर पश्चिमेस रेल्वे स्थानक लगत बालाजी नगर मधील तिरुपती कॉम्प्लेक्स क्र. ३ , शमाईल कॉम्प्लेक्स बंगलो आदी भागातील रहिवाशांना त्यांची जागा घेणार असल्याची धास्ती आहे. रेल्वेने नुकतीच जमीन हद्द व मालकीची कागदपत्रे त्यांच्याकडून मागवली.  रेल्वेने सदर जागा संपादित करण्याच्या कार्यवाही आधी स्थानिक रहिवाशांची बैठक बोलवण्याचे खा. विचारे यांनी सांगितले. 

रेल्वे स्थानकात बालाजी नगर कडून ये - जा करण्याचा मार्ग अतिशय अरुंद असून प्रवाशी त्रस्त झाले असतानाच तेथे प्रवासी उघड्या जागेवर लघुशंका करत असल्याच्या मुद्द्यावर रेल्वे प्रशासनाने पुलाखालच्या मोकळ्या जागा बंद केल्याचे सांगितले. प्रवाशांच्या सोयीसाठी ईटॉयलेटची व्यवस्था करण्यास खा. विचारे यांनी सांगितले. 

प्रवाशांच्या सोयीसाठी एटीव्हीएम मशीन, तिकीट खिडकी व लोकलच्या फेऱ्यात वाढ करा तसेच लांब पल्ल्यांच्या गाडयांना थांबा द्या अशी मागणी केली. एमआरव्हीसी एमयूटीपी ३ ए मार्फत मीरारोड रेल्वे स्थानकाचा कायापालट केला जात आहे. पश्चिमेकडे बोरिवलीच्या धर्तीवर एलिव्हेटेड फलाटचे काम सुरु होणार आहे. प्रस्तावित व सुरु असलेल्या कामांचा यावेळी खा. विचारे यांनी आढावा घेत कामे लवकर पूर्ण करण्याचे रेल्वे प्रशासनास सांगितले. 
 

Web Title: In the railway meeting, the problem of Miraroad and Bhayander railway stations is resolved and facilities are demanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.