Anandacha Shidha: ठाणे जिल्ह्यातील आदिवासींच्या घरात वसूबारसलाही ’आनंदाचा शिधा’ पोहोचला नाही!

By सुरेश लोखंडे | Published: October 21, 2022 06:41 PM2022-10-21T18:41:13+5:302022-10-21T18:41:59+5:30

Anandacha Shidha: कष्टकरी आदिवासी कुटूंबांना यंदाचा १०० रुपयातील ‘आनंदचा शिधा’ ग्रामीण, दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबियाना आजूनही मिळाला नाही, अशी तक्रार श्रमिक मुक्तीच्या कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी वसुबारसच्या संध्याकाळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे केली आहे

In the tribal house of Thane district, even Vasubaras did not reach the 'Anandacha Shidha'! | Anandacha Shidha: ठाणे जिल्ह्यातील आदिवासींच्या घरात वसूबारसलाही ’आनंदाचा शिधा’ पोहोचला नाही!

Anandacha Shidha: ठाणे जिल्ह्यातील आदिवासींच्या घरात वसूबारसलाही ’आनंदाचा शिधा’ पोहोचला नाही!

Next

- सुरेश लोखंडे
 ठाणे : कामकरीत असलेल्या  शेटकडून,सावकाराकडून कर्जकडून किंवा कोणाकडून तरी उसनवारी करून  कच्च्या बच्च्यासाठी दिवाळी सणासाठी खाऊ, कपडे खरेदी करणा-या कष्टकरी आदिवासी कुटूंबांना यंदाचा १०० रुपयातील ‘आनंदचा शिधा’ ग्रामीण, दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबियाना आजूनही मिळाला नाही, अशी तक्रार श्रमिक मुक्तीच्या कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी वसुबारसच्या संध्याकाळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे केली आहे.

‘आनंदाचा शिधा’ या फराळ साहित्यामध्ये अंत्योदय, प्राधान्य कुटुंबातील कार्डधारकांना एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो तेल आणि एक किलो चणाडाळ देण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले आहेत. मात्र महिहना उलटून वासूबारस आली तरीही या फराळाचे साहित्याचा संच मुरबाडसह जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या आदिवासी पा्यांना आजपर्यंतही मिळाला नसल्याचे अ‍ॅड. तुळपुळे यांनी जिलहाधिकाºयांच्या लक्षात आणून दिले आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाºयांकडे आॅनलाइनही तक्रार नोंद केली आहे.

दिवाळीचा सण सुरु झालेला आहे. पण शंभर रुपयातील दिवाळीच्या फराळाचे कीट तर सोडाच दर महा मिळणारे रेशनिंगचे धान्यही आजपर्यंत मिळाले नाही. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या शहापूर , मुरबाड या आदिवासी तालुक्यातीील गावोगावी आदिवासींचे दिवाळी अंधारात असल्याची जाणीव त्यांनी जिल्हा प्रशासनाला करून दिली आहे. पूर्वी भाकरी मागणाºया भारतीय कामगारांना सुनावणाºया इंग्लंडच्या राणी सारखे आपले सरकार आता गरीब आदिवासींना भाकरी नसेल तर लाडू, करंज्या खा असे सांगत आहे. पण प्रत्यक्षात मात्र  लाडू, करंज्या तर नाहीच पण हक्काची भाकरी -भात सुद्धा मिळाली नसल्याची खंत तुळपुळे त्यांनी लोकमतकडे व्यक्त केली.

Web Title: In the tribal house of Thane district, even Vasubaras did not reach the 'Anandacha Shidha'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.