रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत चोख पोलीस बंदोबस्त

By नितीन पंडित | Published: April 21, 2023 07:51 PM2023-04-21T19:51:58+5:302023-04-21T19:52:04+5:30

पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

In the wake of Ramadan Eid, proper police deployment in Bhiwandi | रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत चोख पोलीस बंदोबस्त

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत चोख पोलीस बंदोबस्त

googlenewsNext

भिवंडी: मुस्लिम बांधवांची पवित्र रमजान ईद शनिवारी संपन्न होणार असल्याने संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत व शहरात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी उपायुक्त ढवळे यांनी विशेष नियोजन केले असून शुक्रवारी शहरातील जकात नाका येथील नियंत्रण कक्ष ते धामणकर नाका व मुस्लिम बहुल भागात पोलिसांनी पथ संचलन केले. या पथसंचलनात आरपीएफ पोलिसांसह सहाही पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर शहरात ५०० पोलीस कर्मचारी, १०० पोलीस अधिकारी, एस आर पी एफची एक कंपनी व आरसीएफ दंगा नियंत्रण पथकाची एक कंपनी असा तगडा पोलीस बंदोबस्त शहरात ठेवण्यात आला असून नागरिकांनी शांततेत सण उत्सव साजरा करावा असे आवाहन भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी नागरिकांना केले आहे.

Web Title: In the wake of Ramadan Eid, proper police deployment in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.