त्यांच्या दसरा मेळाव्यात हिंदुत्ववादी विचार सोडून टोमणेच अधिक असणार; शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा टोला  

By अजित मांडके | Published: September 24, 2022 05:18 PM2022-09-24T17:18:38+5:302022-09-24T17:19:01+5:30

त्यांच्या दसऱ्या मेळाव्यात हिंदुत्ववादी विचार नसतील तर केवळ टोमणेच अधिक असतील असा टोला शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाला लगावला.

In their Dussehra gatherings there will be more taunts than Hindutva thinking Shinde group spokesperson Naresh Mhaske | त्यांच्या दसरा मेळाव्यात हिंदुत्ववादी विचार सोडून टोमणेच अधिक असणार; शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा टोला  

त्यांच्या दसरा मेळाव्यात हिंदुत्ववादी विचार सोडून टोमणेच अधिक असणार; शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा टोला  

googlenewsNext

ठाणे :

त्यांच्या दसऱ्या मेळाव्यात हिंदुत्ववादी विचार नसतील तर केवळ टोमणेच अधिक असतील असा टोला शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाला लगावला. निर्णय त्यांच्या बाजूने लागला असला तरी आमची नयायलयील लढाई सुरु असून आम्ही कायद्याचा आदर करत असल्याचे म्हस्के यांनी स्पष्ट केले. 

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी उच्च न्यालयालयाने उद्धव ठाकरे यांना सशर्त परवानगी दिल्यानंतर ठाण्यात शिवसैनिकांनी जल्लोष केला. मात्र या मुद्द्यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते म्हस्के यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर टीका केली. टेभी नाका येथील नवरात्रोत्सवाची माहिती देण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे आणि शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या वतीने यांच्या वतीने शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी म्हस्के यांनी ही टीका केली. शिवाजी पार्क संदार्भात न्यायालयीन लढाई सुरु असून आम्ही कायद्याचा आदर करत असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्याची आठवण करून देताना बाळासाहेब ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यासाठी शिवसैनिक हिंदुत्ववादी विचारांचे सोने लुटण्यासाठी येत होते. मात्र आता त्यांच्या दसऱ्या मेळाव्यात हिंदुत्ववादी विचार सोडून टोमणेच अधिक असणार आहे असा टोला त्यांनी  लगावला.  

आनंद दिघे यांनी ठाण्यात  सुरु केलेल्या दहीहंडी उत्सवाबरोबरच नवरात्रोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात पोचवला. त्यांनी सुरु केलेली ही उत्सवाची परंपरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खऱ्या अर्थाने पुढे नेली असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. त्यामुळेच नवरात्रौत्सवात स्वतः मुख्यमंत्रीही हजर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: In their Dussehra gatherings there will be more taunts than Hindutva thinking Shinde group spokesperson Naresh Mhaske

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे