टीएमटीत महिलांना अर्धे तिकीट, तर ज्येष्ठांना पूर्णपणे मोफत प्रवास

By जितेंद्र कालेकर | Published: March 12, 2024 09:39 PM2024-03-12T21:39:03+5:302024-03-12T21:39:17+5:30

- परिवहन सेवेतील योजनेचा बुधवारी शुभारंभ

In TMT, women get half fare, while senior citizens travel completely free | टीएमटीत महिलांना अर्धे तिकीट, तर ज्येष्ठांना पूर्णपणे मोफत प्रवास

टीएमटीत महिलांना अर्धे तिकीट, तर ज्येष्ठांना पूर्णपणे मोफत प्रवास

ठाणे: ठाणे महापालिकेच्या २०२४-२५च्या अर्थसंकल्पात परिवहन उपक्रमाच्या बसमधून ६० वर्षांवरील नागरिकांना विनामूल्य प्रवास, महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत, बसमधील डाव्या बाजूची आसने महिलांसाठी राखीव ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आयुक्त अभिजित बांगर यांनी केली.

या योजनेचा शुभारंभ १३ मार्च रोजी सकाळी १०:०० वा. सॅटिस पूल, ठाणे रेल्वे स्टेशन येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख, माजी महापौर नरेश म्हस्के, मीनाक्षी शिंदे, परिवहन सभापती विलास जोशी, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे, परिवहन समिती सदस्य व माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.

Web Title: In TMT, women get half fare, while senior citizens travel completely free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे