पप्पु कलानी यांच्या भावाला ४१ लाखाचा गंडा; गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Published: September 30, 2022 04:27 PM2022-09-30T16:27:55+5:302022-09-30T16:29:04+5:30
मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
सदानंद नाईक
उल्हासनगर: पप्पु कलानी यांचे भाऊ नारायण कलानी यांनी सीमा हॉटेल, फर्निचर दुकान यांचे टॅक्स व जीएसटी भरण्यासाठी ओळखीच्या कृष्णकांत फुलपारधी याला कॅनेरा व ऍक्सेस बँकेचे तीन वेगवेगळ्या रक्कमेचे चेक दिले होते. मात्र फुलपाराधी याने हॉटेलचा टॅक्स व जीएसटी ना भरता मित्रांच्या बँक खात्यात चेक वठवुन ४० लाख ९७ हजार ३८५ रुपयांची फसवणूक कलानी यांची केल्या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-२ खेमानी परिसरात माजी आमदार पप्पु कलानी यांचे मोठे भाऊ नारायण कलानी कुटुंबासह राहतात. त्यांनी सीमा हॉटेल व फर्निचर दुकानाचे टॅक्स व जीएसटी भरण्यासाठी कॅनेरा व एक्सेस बँकेचे तीन धनादेश कृष्णकांत फुलपारथी याला ३ ऑक्टोबर २०२० ते १८ ऑगस्ट २०२२ दरम्यान दिले. फुलपारथी याने ४० लाख ९७ हजार ३८५ रुपयांचे सीमा हॉटेल व फर्निचर हॉटेल यांचे टॅक्स व जीएसटी टॅक्स न भरता, चेक मित्राच्या बँक खात्यात वठवून घेऊन कलानी यांची फसवणूक केली.
नारायण कलानी यांना आपली फसवणुक झाल्याचा प्रकार लक्षात आल्यावर, त्यांनी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना दिला. मध्यवर्ती पोलिसांनी ४० लाख ९७ हजार ३८५ रुपये फसवणूक प्रकरणी फुलपराथी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास मध्यवर्ती पोलीस करीत आहेत.