उल्हासनगरात भुयारी गटात कामावेळी जलवाहिनी फुटली; अनेक घरात पाणी, नागरिक संतप्त

By सदानंद नाईक | Published: March 22, 2024 06:06 PM2024-03-22T18:06:08+5:302024-03-22T18:06:19+5:30

महापालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांनी पथकासह जलवाहिनी फुटलेल्या ठिकाणी भेट देऊन जलवाहिनी युद्धपातळीवर दुरुस्ती केली.

In Ulhasnagar, a water pipe burst during work in a subway group; Water in many houses, citizens angry | उल्हासनगरात भुयारी गटात कामावेळी जलवाहिनी फुटली; अनेक घरात पाणी, नागरिक संतप्त

उल्हासनगरात भुयारी गटात कामावेळी जलवाहिनी फुटली; अनेक घरात पाणी, नागरिक संतप्त

उल्हासनगर : शहरातील कुर्ला कॅम्प परिसरात भुयारी गटार पाईप टाकण्याच्या वेळी पाण्याची जलवाहिनी फुटल्याने, काही नागरिकांच्या घरी पाणी घुसले. यांप्रकाराने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी काँग्रेस शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी केली.

 उल्हासनगरात भुयारी गटार पाईप टाकण्याचे काम सुरू असून त्यामध्ये अनियमितता असल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. कॅम्प नं-४, कुर्ला कॅम्प गुरुनानक शाळा जलकुंभ परिसरात रस्ता खोदून गटारीचे पाईप टाकण्याचे काम बुधवारी रात्री सुरू होते. त्यावेळी खोदकाम सुरू असताना जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी खाली गेले. तसेच शेजारील काहीं घरात पाणी घुसल्याने, नागरिकांनी नाराजी व्यक्त करून कारवाईची मागणी केली. स्थानिक नगरसेविका अंजली साळवे यांनी शहरातील भुयारी गटारी खोदताना कोणतीही सुरक्षा न घेता रस्ते खोदत जात असल्याने, नागरिकांची गैरसोय होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त केली. तर काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी भुयारी गटार योजनेबाबत नागरिकांत असंतोष निर्माण झाला असून रस्ते धुळीने माखल्याने, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले.

 महापालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांनी पथकासह जलवाहिनी फुटलेल्या ठिकाणी भेट देऊन जलवाहिनी युद्धपातळीवर दुरुस्ती केली. मात्र दोन दिवस पाणी बंद राहिल्याने, नागरिकांचे हाल झाले. भुयारी गटार खोदताना अनेक वेळा जलवाहिन्या तुटण्यात आल्या असून गटारीचे काम अटीशर्तीचें उल्लंघन करून होत असल्याची टीका शहरातून होत आहे. भुयारी गटारीचे २९ टक्के पेक्षा जास्त काम झाल्याचा दावा पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख बुडगे यांनी करून ठेकेदाराला १५ कोटी पेक्षा जास्त निधी दिल्याची माहिती दिली. 

खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती नाही 
शहरातील रस्ते खोदून भुयारी गटारीचे पाईप टाकण्यात येत आहे. मात्र खोदलेले रस्त्याची दुरुस्ती केली जात नसल्याने, शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन आरोग्याची परिस्थिती निर्माण झाली.

 *ठेकेदाराला विचारला जाब...आयुक्त अजीज शेख
 शहरात रस्ते खोदून गटारीचे पाईप टाकण्यात येत असून रस्ते खोदतांना पाण्याच्या जलवाहिनी तुटल्या जात आहे. ठेकेदाराकडून झालेली नुकसान भरपाई केली जात असून त्यांना तसे आदेश दिले आहे.

Web Title: In Ulhasnagar, a water pipe burst during work in a subway group; Water in many houses, citizens angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.