उल्हासनगरात काँग्रेसने केले भिडेंच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन
By सदानंद नाईक | Published: July 30, 2023 05:02 PM2023-07-30T17:02:22+5:302023-07-30T17:07:37+5:30
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील एका कार्यक्रमात मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याबद्दल अत्यंत अवमानकारक वक्तव्य करून, महात्मा गांधी यांचा अपमान केला.
उल्हासनगर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी केलेल्या अपमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेसने भिडे यांच्या प्रतिमेला नेहरू चौकात जोडोमारो आंदोलन केले. शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील एका कार्यक्रमात मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याबद्दल अत्यंत अवमानकारक वक्तव्य करून, महात्मा गांधी यांचा अपमान केला. भिडे यांच्या अपमानकारक वक्तव्याचा समाचार शहर काँग्रेसने घेऊन, पक्षनेते मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली नेहरू चौक येथे शनिवारी निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी भिडेच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला. राष्ट्रपित्या बाबतची भिडे यांची टीकाटिप्पणी संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी असल्याचे शहरजिल्हाध्यक्ष साळवे म्हणाले. सर्वधर्मसमभाव ही आपल्या देशाची खरी ओळख आहे, पण ही ओळख पुसण्याचा संभाजी भिडे सारख्या मनुवादी प्रवृत्तीचा प्रयत्न आहे, आणि आम्ही त्याचा निषेध करतो असे रोहित साळवे यांनी यावेळी सांगितले.
शहरातील नेहरू चौक येथील आंदोलनात किशोर धडके, नानिक आहुजा, वज्जिरुदिन खान, अंजली साळवे, सुनिल बहराणी, महादेव शेलार, आशाराम टाक, श्याम मढवी, विशाल सोनवणे, दीपक सोनोने, प्रा. नारायण गेमनानी, प्रा सिंधुताई रामटेके, भारती फुलवरिया, उषा गिरी ,सुलक्षण भालेराव, कालिंदी गवई, मालती गवई, विद्या गाढे, शाहिस्ता परवीन, आबा साठे, रोहित गोखले, किशोर शेळके, शहनाज, राकेश मिश्रा, प्रविण वाघमारे, अन्सारी, प्रमोद शिंदे, निलेश जाधव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.