उल्हासनगर महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By सदानंद नाईक | Published: June 1, 2024 04:38 PM2024-06-01T16:38:02+5:302024-06-01T16:39:18+5:30
गुणवंत विध्यार्थांना भविष्यातील शिक्षणासाठी यावेळी मार्गदर्शन केले आहे.
सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या इयत्ता १० वी व १२ वी मधील गुणवंत मुलांचा गौरव व सत्कार महासभा सभागृहात आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते झाले. गुणवंत विध्यार्थांना भविष्यातील शिक्षणासाठी यावेळी मार्गदर्शन केले आहे.
उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या चला वळू या ध्येयाकडे या संकल्पनेतून महापालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या इयत्ता १० वी १२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींचा गुणगौरण सोहळा महापालिका महासभा सभागृहात आयोजित केला होता. यावेळी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांची मुलगी अरिबा लेंगरेकर ही १० वीमध्ये ९० टक्के गुणांनी, सहायक संचालक नगररचनाकार ललीत खोब्रागडे यांचा मुलगा मध्यांश १० वीमध्ये ९७ टक्के गुणांनी, सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनिष हिवरे यांची मुलगी सौम्या ही १२ वीमध्ये ९५ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाले. याव्यतिरिक्त इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या गुणवंत मुलांचा महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी कौतुक करून सत्कार केला.
महापालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या गुणवंत मुलांच्या कार्यक्रमाला अतिरिक्त् आयुक्त जमीर लेंगरेकर, सहायक संचालक, नगररचनाकार ललीत खोब्रागडे, उपायुक्त किशोर गवस, डॉ. सुभाष जाधव, सहायक आयुक्त गणेश शिंपी, सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनिष हिवरे, महापालिका सचिव प्राजक्ता कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, उपलेखा अधिकारी निलम कदम, मुख्य अग्निशमन अधिकारी बाळू नेटके, विधी अधिकारी राजा बुलानी, क्रीडा अधिकारी शांताराम चौधरी, उद्यान अधिक्षक दिप्ती पवार, पर्यावरण विभाग प्रमुख विशाखा सावंत, दिव्यांग विभाग प्रमुख राजेश घनघाव आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाधिकारी सागर धनाजी मुळीक, व डी.ओ. दिक्षा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.