उल्हासनगरात पावसाने रस्ते जलमय, झाडे पडले
By सदानंद नाईक | Published: September 27, 2023 08:01 PM2023-09-27T20:01:38+5:302023-09-27T20:02:01+5:30
उल्हासनगरात दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान जोरदार वारा व विजेच्या कडकडाटात पाऊस सुरू होऊन एका तासाच्या जोरदार पावसात गोलमैदान, आयटीआय कॉलेज, राजीवगांधीनगर, राधाबाई चौक, शांतीनगर आदी परिसरातील रस्त्यात पाणी साचले होते.
उल्हासनगर : विजेच्या कडकटासह दुपारी ४ वाजता झालेल्या पावसाने शहरातील अनेक रस्ते जलमय झाले होते. तर तीन ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या असून कोणतीही जीवित व वित्तहानी झाली।नसल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांनी दिली.
उल्हासनगरात दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान जोरदार वारा व विजेच्या कडकडाटात पाऊस सुरू होऊन एका तासाच्या जोरदार पावसात गोलमैदान, आयटीआय कॉलेज, राजीवगांधीनगर, राधाबाई चौक, शांतीनगर आदी परिसरातील रस्त्यात पाणी साचले होते. तर आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालय परिसरात पावसाचे पाणी तुंबल्याची घटना घडली.
कॅम्प नं-३ येथील साईबाबा मंदिर व समतानगर परिसरात झाडे पडल्याच्या ३ घटना घडल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांनी दिली आहे. गणेश।मंडळाच्या पदाधिकार्यांची यामुळे धावपळ वाढल्याचे चित्र होते.