उल्हासनगरात शिवसेना ठाकरे गटाच्या होऊ द्या चर्चां कार्यक्रमाला गालबोट
By सदानंद नाईक | Published: October 7, 2023 05:19 PM2023-10-07T17:19:52+5:302023-10-07T17:20:24+5:30
उल्हासनगर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने होऊ द्या चर्चा या कार्यक्रमा अंतर्गत शहरातील विविध चौकात नुक्कड सभा घेऊन सत्ताधारी पक्षाच्या कारभाराचा भांडाफोड करीत होते.
उल्हासनगर : शिवसेना ठाकरे गटाच्या होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात एका उपस्थित तरुणाने पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याने, भाजप आक्रमक होऊन, गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पक्षाचे जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे यांच्यासह २७ जणां विरोधात गुन्हा दाखल झाला. तसेच पोलिसांनी पुढील कार्यक्रमाच्या परवानग्या रद्द केल्या आहेत.
उल्हासनगरशिवसेना ठाकरे गटाच्या वतीने होऊ द्या चर्चा या कार्यक्रमा अंतर्गत शहरातील विविध चौकात नुक्कड सभा घेऊन सत्ताधारी पक्षाच्या कारभाराचा भांडाफोड करीत होते. याप्रकारने नागरिकांत चर्चेला उधाण आले असतांना शुक्रवारी कॅम्प नं-३ येथे झालेल्या होऊ द्या चर्चा या नुक्कड सभेत पंतप्रधान मोदी यांनी तरुणांना नोकऱ्या दिल्या का? असा प्रश्न उपस्थित तरुणांना विचारला. त्यावेळी एका तरुणाने पंतप्रधान मोदी यांच्या बाबत अपशब्द काढले. सादर कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, पक्ष कार्यकर्त्यांनी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांना याबाबत माहिती दिल्यावर त्यांनी पदाधिकार्यांची बैठक बोलावून, रात्री थेट मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठले.
शिवसेना ठाकरे गटाच्या होऊ द्या चर्चा या नुक्कड सभेच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्या बाबत एका तरुणाने अपशब्दाचा वापरल्याने, उपस्थितांनी हसून प्रतिक्रिया दिला. असा आरोप भाजपचे रामचंदानी यांनी केला. या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. भाजपच्या शिष्टमंडळात शहर जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, प्रकाश माखिजा, कपिल अडसूळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. अखेर रात्री उशिरा कपिल अडसूळ यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे, शहरप्रमुख रवींद्रसिंग भुल्लर, दिलीप मिश्रा, शिवाजी जावळे, शोभा जाधव यांच्यासह तब्बल २६ जणां विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकाराने शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे.
ही तर हुकूमशाही, कोर्टात जाणार - धनंजय बोडरे (शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक)
होऊ द्या चर्चा कार्यक्रमात उपस्थितांना मोदी सरकारने नोकऱ्या दिल्या का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावरील तरुणांच्या प्रतिक्रियेला शिवसेना व पक्षाचे पदाधिकारी जबाबदार नाही. त्यावरून कार्यक्रमाच्या परवानग्या रद्द करून गुन्हे दाखल करणे।म्हणजे ही वाटचाल हुकूमशाहीकडे आहे. लोकशाही धोक्यात आल्याचे संकेत आहे.