उल्हासनगरात नणंदे सोबत झालेल्या भांडणाच्या रागातून घरच पेटविले, पत्नी विरोधात गुन्हा दाखल

By सदानंद नाईक | Published: August 23, 2023 02:28 PM2023-08-23T14:28:45+5:302023-08-23T14:29:34+5:30

...या भांडणाच्या रागातून पत्नी पिंकी हिने राहत्या घराला आग लावल्याचा प्रकार घडला आहे. 

In Ulhasnagar, the house was set on fire due to a quarrel a case was registered against woman | उल्हासनगरात नणंदे सोबत झालेल्या भांडणाच्या रागातून घरच पेटविले, पत्नी विरोधात गुन्हा दाखल

प्रतिकात्मक फोटो...

googlenewsNext

 
उल्हासनगर - कॅम्प नं-३, फॉरवर्ड लाईन चौकातील दुकानात बसलेल्या रमेश बजाज यांची पत्नी पिंकी व बहीण सिमरन राजपाल यांच्यात मंगळवारी सकाळीं साडेदहा वाजता शाब्दिक भांडण झाले. या भांडणाच्या रागातून पत्नी पिंकी हिने राहत्या घराला आग लावल्याचा प्रकार घडला आहे. 

उल्हासनगर फॉरवर्ड लाईन चौकात रमेश हिरानंद बजाज यांचे पुष्पा मिल्क एजन्सीचे दुकान आहे. मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता ते दुकानात बसले असतांना पत्नी व बहीण सिमरन तेथे येऊन यांच्यात कडाक्याचे शाब्दिक भांडण झाले. नणंद सोबत झालेल्या रागातून पिंकी यांनी सन्मुख इमारती मधील घराला आग लावली. 

या आगीत घरातील टीव्ही, फ्रीज, सोफासेट, खुर्च्या, वॉशिंग मशीनसह अन्य लाखो रुपये किंमतीच्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने अग्निशमन विभागाच्या जवानांनी आग लवकर विझविल्याने, इतर घरांना आगीची झळ बसली नाही. अखेर रमेश बजाज यांनी पत्नी पिंकी विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर, पोलिसांनी पिंकी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
 

 

Web Title: In Ulhasnagar, the house was set on fire due to a quarrel a case was registered against woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.