दिवंगत आमदार रामनाथ मोते यांना अभिवादन
By सदानंद नाईक | Published: September 26, 2022 05:30 PM2022-09-26T17:30:40+5:302022-09-26T17:31:21+5:30
दिवंगत रामनाथ मोते यांच्या दुसऱ्या स्मृती दिनानिमित्त एनसीटी शाळेच्या सभागृहात अभिवादन सभेचे आयोजन केले होते.
सदानंद नाईक
उल्हासनगर : दिवंगत रामनाथ मोते यांच्या दुसऱ्या स्मृती दिनानिमित्त एनसीटी शाळेच्या सभागृहात अभिवादन सभेचे आयोजन रविवारी केले होते. शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस अध्यक्षपदी असून यावेळी मोते यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
उल्हासनगरातील रामनाथ मोते हे गेले १२ वर्ष शिक्षक आमदार पदी होते. साधी राहणीमान असलेले मोते यांची दिनचर्या सकाळी ५ वाजल्या पासून सुरू व्हायची. सकाळी ७ वाजता ते आपल्या कार्यालयात हजर असायचे. तर रात्री १२ वाजे पर्यंत ते काम करीत असत. सततच्या व्यस्त कामामुळे स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष झाल्याने, त्यांना कमी वयात विविध व्याधीने जडले होते. कोरोना काळात त्यांचा मृत्यू झाल्याने, शिक्षक संघटनेत दुःख व्यक्त करण्यात आले होते. त्यांच्या दुसऱ्या स्मृती दिनाचे औचित्य साधून शिक्षण क्रांती संघटनेच्या वतीने, रविवारी एनसीटी शाळेच्या सभागृहात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. आलेल्या मान्यवरांनी मोते यांच्या कार्याचा आढावा घेऊन उजाळा देण्यात आला. यावेळी सुधीर घागस, दिलीप मालवणकर, व्ही व्ही पाटील, प्रकाश चौधरी आदींनी मोते यांच्या कामाची माहिती दिली.
शिक्षण क्रांती संघटनेचे दिनकर खोसे, दादाजी निकम, देविदास नरवाडे, राजेंद्र गवळी, विकास गवई आदींनी मोते यांच्या अभिवादन सभेचे आयोजन केले. मोते यांच्या स्वप्नातील राहिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न शिक्षण क्रांती संघटना करणार असल्याचे संघटनेचे देविदास नरवाडे यावेळी म्हणाले.