लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळेेेे लसीकरणास वेग येईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:28 AM2021-07-18T04:28:24+5:302021-07-18T04:28:24+5:30
ठाणे : ठाणे जिल्ह्यात ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून लसीकरणाचा बोजवारा उडत असल्याचे दिसून येत ...
ठाणे : ठाणे जिल्ह्यात ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून लसीकरणाचा बोजवारा उडत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी लसीकरण थांबले आहे. यात शनिवारी अवघा ३० हजार लसींचा साठा उपलब्ध झाल्यानंतर सोमवारपासून पुन्हा लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे. मात्र, मिळालेला साठा हा अवघा एक दिवस पुरेल इतकाच असल्याने मंगळवारी परत ठाणे शहरातील लसीकरण बंद ठेवण्याची वेळ ओढवणार असल्याचे दिसून येत आहे.
यामध्ये २९ हजार कोविशिल्ड आणि एक हजार ६८० कोव्हॅक्सिनच्या लसींचा समावेश आहे. मागील आठवड्यात मंगळवारी अवघ्या २५ हजार कोविशिल्ड लसींचा साठा उपलब्ध झाला. त्यानुसार, जिल्ह्यातील काही केंद्रांवर कोव्हिशिल्ड लसीची दुसरी मात्रा देण्यात येत होती. परंतु, साठा अपुरा असल्यामुळे लसीकरण केंद्रांवर ऑनलाइन सुविधा उपलब्ध न करता वॉक ईन पद्धतीने लसीकरण सुरू ठेवले होते. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर कुपन घेण्यासाठी नागरिक पहाटेपासून रांगा लावत आहेत. दरम्यान, ठाणे, कल्याण - डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील लशींचा साठा शुक्रवारी संपल्यामुळे या शहरातील लसीकरण केंद्रे शनिवारी बंद ठेवली होती. असे असताना शनिवारी अवघ्या ३० हजार लसींचा साठा प्राप्त झाला. हा साठादेखील अपुरा असल्याने लसीकरण मोहिमेला वेग कसा येईल, असा सवाल सर्वसामान्य विचारत आहेत.