पहिले राज्स्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलनाच्या लोगोचे अनावरण संपन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 03:29 PM2018-11-21T15:29:22+5:302018-11-21T15:33:49+5:30

युवाशक्ती पहिले राज्स्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलनाच्या लोगोचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. 

The inauguration of the first National Yuvraj Shiksha Sammelan | पहिले राज्स्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलनाच्या लोगोचे अनावरण संपन्न 

पहिले राज्स्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलनाच्या लोगोचे अनावरण संपन्न 

Next
ठळक मुद्देपहिले राज्स्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलनाच्या लोगोचे अनावरणसंपादिका मोनिका गजेंद्रगडकर आणि संपादक अशोक कोठावळे यांच्या हस्ते संपन्न दिवाळी अंक - सुसंवाद संपादकांशी

ठाणे : कोकण मराठी साहित्य परिषद, युवाशक्ती पहिले राज्स्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलन ८ आणि ९ डिसेंबर रोजी अंबरनाथ येथे होत आहे..त्यानिमित्ताने कोमसाप युवाशक्तीचा लोगोचे अनावरण ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय येथे प्रसिद्ध लेखिका , संपादिका मोनिका गजेंद्रगडकर आणि संपादक अशोक कोठावळे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी कोमसापच्या केंद्रीय कार्याध्यक्षा नमिता कीर , कोमसापचे केंद्रीय कार्यवाह शशिकांत तिरोडकर, कोमसापच्या झपूर्झा त्रैमासिकाचे संपादक दत्तात्रय सैतवडेकर व ज्यांच्या साहाय्याने हा लोगो तयार केला ते लेखक, कवी रामदास खरे आदी उपस्थित होते.

कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शाखा आयोजित दिवाळी अंक - सुसंवाद संपादकांशी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शाखा अध्यक्ष मेघना साने देखील उपस्थित होत्या. या लोगोचे अनावरण करण्यात आले. सुरुवातीला कोकण मराठी साहित्य परिषदेचे 'पाहिले राज्यस्तरीय युवाशसेक्ती साहित्य संमेलन' येत्या ८ आणि ९ डिसेंबर २०१८ रोजी, अंबरनाथ येथे प्रसिद्ध युवा लेखक अरविंद जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून राज्याच्या विविध भागांतील आघाडीचे युवा साहित्यकार या संमेलनात सहभागी होत आहेत, अशी माहिती 'कोमसाप' युवाशक्तीच्या केंद्रीय अध्यक्षा प्रा. दीपा ठाणेकर यांनी दिली. सैतवडेकर यांनी आपल्या मनोगत संपादकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य बद्दल मुद्दा मांडला. दरम्यान दिवाळी अंकांच्या संपादकांचे सत्कार यावेळी करण्यात आले. नमिता किर यांनी आपल्या मनोगतात आपला दर्जा सांभाळून नवीन दिवाळी अंक निघत आहेत. ११० वर्षांची परंपरा दिवाळी अंकाला आहे. जगण्याची मूल्ये साहित्यातून परिवर्तित होतात म्हणून दिवाळी अंकाचे महत्त्व कायम आहे. त्यानंतर अशोक कोठावळे आणि मोनिका गजेंद्रगडकर यांच्याशी शाखा कार्याध्यक्ष गीतेश शिंदे यांनी संवाद साधला. या दोघांनी दिवाळी अंकाच्या संपादनाचा प्रवास रसिकांसमोर उलगडला. तसेच प्रिंट मीडियाला कधीही मरण नाही असे ठाम मत दोघांनी व्यक्त केले. 

Web Title: The inauguration of the first National Yuvraj Shiksha Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.