दहिवली मुरबाड येथे नवक्रांती मित्र मंडळाच्या मदतीने ग्रंथालयाचे उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 04:17 AM2018-05-03T04:17:34+5:302018-05-03T04:17:34+5:30
दहिवली - गाव तिथे ग्रंथालय उभारण्याच्या प्रेरणेने मुंबई व ठाणे विभागात काम करणाऱ्या युवकांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांकडुन पुस्तके जमा केली होती. जमलेल्या पुस्तकांचे ग्रंथालय यापुर्वी साद फाउंडेशनच्या मदतीने बेडीसगाव वांगणी, दि वात्सल्य फाऊंडेशनच्या ग्रामविकास प्रकल्प झाडघर मुरबाड त्याचबरोबर फागणे येथील आजीबाईची शाळा आणि देवरुंग येथील मैत्रकुल येथे सुरु करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी गाव तिथे ग्रंथालय ही मोहीम युवकांमार्फत संपुर्ण महाराष्ट्रभर चालवली जात आहे.
मुंबई आणि ठाणे परिसरात चालणाऱ्या ह्या मोहिमेला टीम परिवर्तन कल्याण, साद फाउंडेशन अंबरनाथ, अलका सावली प्रतिष्ठान कल्याण, अंघोळीची गोळी मुंबई, इकोड्रॉईव्ह यंगस्टर्स फाउंडेशन कल्याण, सेवक फाउंडेशन, जय फाउंडेशन व इतर अनेक सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांची मदत मिळत आहे. नुकतेच जमलेल्या पुस्तकांचे ग्रंथालय दहिवली येथील माध्यमिक शाळेत करण्यात आले यावेळीं नवक्रांती मित्र मंडळ दहिवलीचे अनेक कार्यकर्ते तसेच शाळेचे मुख्याध्यापक भगवान देसले उपस्थित होते. त्याचबरोबर यावेळीं अलका सावली प्रतिष्ठान कल्याणच्या मदतीने जमा केलेल्या सायकलीचे वाटप देखील गरजु मुलींना करण्यात आले.
ज्ञान दानाची गाव तिथे ग्रंथालय ही मोहीम त्याचबरोबर दुर्गम आणि दुर्लक्षित भागांतील विद्यार्थ्यांना सायकली आणि शैक्षणिक साहित्य देण्यासाठी आमची मंडळी काम करत आहे नागरिकांनी या मोहिमेसाठी मदत करण्याचे आवाहन यावेळीं तुषार वारंग याने केले.