रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 02:46 PM2020-08-15T14:46:56+5:302020-08-15T14:47:37+5:30
जिल्ह्यातील सर्व कोविड १९ रुग्णांसाठी केंद्रीय रूग्ण व्यवस्थापन प्रणाली असणार आहे.
ठाणे: जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांनी जिल्हयातील सर्व कोविड १९ रुग्णांसाठी केंद्रीय रूग्ण व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. ठाणे जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यातील सर्व कोविड १९ रुग्णांसाठी केंद्रीय रूग्ण व्यवस्थापन प्रणाली असणार आहे. १८०० १२० ५२८२ या टोल फ्री क्रमांकावर ही सुविधा उपलब्ध आहे. एखाद्या मनपात बेड उपलब्ध नसल्यास जिल्हास्तरावरून दुस या मनपातील रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्याची सुविधा आहे यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार आहे.
टोल फ्री क्रमांकावर कॉल करून रुग्णांना बेड उपलब्ध होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. बेड उपलब्ध झाल्याबाबत रूग्णाला एसएमएसद्वारे सूचना मिळणार आहे. त्यामुळे बेडआभावी उपचार न मिळण्याची समस्या दुर होण्यास मदत होणार आहे. जिल्हा स्तरावर तसेच प्रत्येक मनपा व नगरपालिका स्तरावर २४ तास कंट्रोल रूम कार्यरत असणार आहे.जिल्ह्यातील सर्व सीसीसी, डीसीएचसी व डीसीएच मधील बेड्स उपलब्धतता अद्यावत स्वरूपात एका क्लिकवर उपलब्ध असणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील कंट्रोल रूममध्ये २४ तास कर्मचारी कार्यरत ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी अपली गैरसोय टाळण्यासाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शिंदे यांनी केले.