जि.प.मध्ये सॅनिटरी नॅपिकन व्हेन्डीग मशीन व इन्सिनेरेटर मशीनचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 11:02 PM2019-01-28T23:02:04+5:302019-01-28T23:02:40+5:30

जिल्हा परिषद पालघर कार्यालयाच्या ठिकाणी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अतंर्गत प्रजासत्ताक दिनी सॅनिटरी व्हेन्डीग मशीन व इन्सिनेटरचे उद्घाटन महिला व बाल कल्याण समिती सभापती धनश्री चौधरी व समाजकल्याण सभापती दर्शना दुमाडा यांच्या हस्ते करण्यात आले.

Inauguration of Sanitary Napkin Vending Machine and Insulator Machine in ZP | जि.प.मध्ये सॅनिटरी नॅपिकन व्हेन्डीग मशीन व इन्सिनेरेटर मशीनचे उद्घाटन

जि.प.मध्ये सॅनिटरी नॅपिकन व्हेन्डीग मशीन व इन्सिनेरेटर मशीनचे उद्घाटन

Next

पालघर : जिल्हा परिषद पालघर कार्यालयाच्या ठिकाणी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अतंर्गत प्रजासत्ताक दिनी सॅनिटरी व्हेन्डीग मशीन व इन्सिनेटरचे उद्घाटन महिला व बाल कल्याण समिती सभापती धनश्री चौधरी व समाजकल्याण सभापती दर्शना दुमाडा यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पालघर जिल्हा परिषदचे अध्यक्ष विजय खरपडे, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, पोलिस अधिक्षक गौरव सिंग, जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश गंधे सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी, अधिकारी, पदाधिकारी तसेच पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील महिला व जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ या वयोगटातील किशोरवयींन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकीन व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती करणे व माफक दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्याकरिता अस्मिता योजनेचा एकभाग म्हणून जिल्हा परिषद पालघर यांचे वतीने किशोरवयींन मुलींमध्ये जनजागृतीसाठी पुढाकार घेण्यात आलेला आहे. जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचारी यांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकीनची उपलब्ध व्हावी याकरिता ही मशीन बसवली आहे. तसेच वापर केलेले सॅनिटरी नॅपिकन उघड्यावर फेकून देता इन्सिनेटर मशीनद्वारे विल्हेवाट लावता येते.

Web Title: Inauguration of Sanitary Napkin Vending Machine and Insulator Machine in ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.