दिव्यांगाचे प्रोत्साहन अनुदान हजाराहून पंधराशेवर, उल्हासनगरात दिवाळी दणक्यात
By सदानंद नाईक | Published: November 10, 2023 08:22 PM2023-11-10T20:22:32+5:302023-11-10T20:22:46+5:30
१ हजार ५३६ दिव्यांगांची दिवाळी गोड! ४८ लाखाचा धनादेश काढल्याची माहिती
सदानंद नाईक, उल्हासनगर: महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी शहरातील दिव्यांग बांधवाना देण्यात येणारा प्रोत्साहन अनुदान भत्ता दरमहा हजाराहून पंधराशे केला. १ हजार ५३६ दिव्यांगांची दिवाळी गोड होणार असून ४८ लाखाचा धनादेश काढल्याची माहिती दिव्यांग विभाग प्रमुख राजेश घनघाव यांनी दिली आहे.
उल्हासनगर महापालिका दिव्यांग विभागाकडे एकून २ हजार १९९ दिव्यांग बांधवाची नोंदणी झाली आहे. महापालिका दिव्यांग बांधवाना दरमहा १ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान भत्ता देते. तसेच त्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवून त्यांना लागणारे साहित्य मोफत देते. १ हजार ऐवजी १५०० दरमहा प्रोत्साहन अनुदान भत्ता देण्याची मागणी झाली होती. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी दिवाळी पासून १ हजार ऐवजी १५०० रुपये प्रोत्साहन अनुदान भत्ता देण्याचा निर्णय घेतला. दिव्यांग बांधवाकडून हयातीचा दाखल मागितल्यावर २ हजार १९९ पैकी १५३६ नागरिकांनी महापालिका दिव्यांग विभागात हा यातीचे दाखले जमा केले.
महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी दिवाळी निमित्त हयातीचे दाखल जमा झालेल्या १५३६ बांधवाना दोन महिन्याचे प्रोत्साहन अनुदान भत्ता देण्याचे जाहीर करून, ४८ लाखाचा धनादेश काढला. आयुक्तांच्या निर्णयाने, दिव्यांग बांधवाची दिवाळी आनंदात जाणार असल्याची प्रतिक्रिया अपंग विकास महासंघाचे राजेश साळवे व अशोक भोईर यांनी व्यक्त केली आहे. दिवाळीपूर्वी दिव्यांग बांधवाची बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याची प्रतिक्रिया दिव्यांग विभाग प्रमुख राजेश घनघाव यांनी दिली आहे.