ब्ल्यु स्टार कंपनी विरोधात सुरक्षा रक्षकांचे बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 02:12 AM2017-08-16T02:12:15+5:302017-08-16T02:12:21+5:30
ब्ल्यु स्टार या कंपनीतील चार सुरक्षा रक्षकांना कंपनीने तडकाफडकी कामावरून काढून टाकण्याच्या निषेधार्थ कामगारांनी सोमवारपासून कंपनीच्या गेटसमोर बेमुदत उपोषण सुरू केले
वाडा : ब्ल्यु स्टार या कंपनीतील चार सुरक्षा रक्षकांना कंपनीने तडकाफडकी कामावरून काढून टाकण्याच्या निषेधार्थ कामगारांनी सोमवारपासून कंपनीच्या गेटसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
तालुक्यातील वसुरी गावाच्या हद्दीत ही कंपनी आहे. या कंपनीत मोहित वेखंडे, सनीत गोळे, दर्शन आंबवणे व सुरज जाधव हे सुरक्षा रक्षक म्हणून कामावर कार्यरत होते. मात्र, कंपनी प्रशासनाने त्यांना कोणतेही कारण न देता तडकाफडकी कामावरून कमी केले. त्यानंतर खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले.
सुरक्षा रक्षक मंडळाने कंपनीकडे सुरक्षा रक्षकांना कामावर घ्या अशी अनेक वेळा पत्रे देऊनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्याच्या निषेधार्थ व सुरक्षा रक्षकांना पुन्हा कामावर घ्या या मागणीकडे कंपनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून कंपनीच्या गेटसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियनचे संयुक्त सरचिटणीस अजिंक्य भोसले करीत आहेत.