तिकीट निरीक्षकाच्या प्रसंगावधानाने वाचले तरुणाचे प्राण, कल्याण स्टेशनवरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 06:34 PM2018-02-16T18:34:45+5:302018-02-16T18:38:02+5:30

The incident occurred at the Kalyan station | तिकीट निरीक्षकाच्या प्रसंगावधानाने वाचले तरुणाचे प्राण, कल्याण स्टेशनवरील घटना

तिकीट निरीक्षकाच्या प्रसंगावधानाने वाचले तरुणाचे प्राण, कल्याण स्टेशनवरील घटना

googlenewsNext

- पंकज पाटील 
अंबरनाथ -  कल्याण रेल्वे स्थानकात एक्सप्रेस गाडी पकडतांना पाय सटकल्याने पडलेल्या तरुणला लागलीच आधार देत त्याचा जीव वाचविण्याचे काम ऑन डय़ुटी असलेल्या टीसीने केले आहे. हा सर्व प्रकार कल्याणच्या फलाट क्रमांक 4 वर घडला असुन हा सर्व थरारक प्रकार स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 

    मुंबईहुन लखनौरला जाणारी पुष्पक एक्सप्रेस कल्याण स्थानकात सकाळी 9.3क् वाजता आली. याच एक्सप्रेसमध्ये टिकीट तपासुन टीसी शशिकांत चव्हाण हे कल्याण स्थानकात उतरले. स्थानकात आपल्या सहकारी टीसीसोबत ते बोलत असतांना एक्सप्रेसगाडी स्थानकातुन सुटली. गाडीने वेग पकडलेला असतांनाच संदिप सोनकर या प्रवाशाने ही एक्सप्रेस पकडण्याचा प्रय} केला. मात्र या प्रय}ात त्याचा पाय सरकल्याने तो गाडी आणि फलाटाच्या मध्ये असलेल्या अंतरात पडणार याची कल्पना येताच टीसी चव्हाण यांनी त्या तरुणाच्या दिशेने धाव घेत त्याला लागलीच पकडले. येवढेच नव्हे तर स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्यांनी त्याला गाडी सुरु असतांनाच फलाटावर पकडुन ठेवले. चव्हाण यांच्याकडुन क्षणाचा जरी विलंब झाला असता तर संदिन नावाचा हा तरुण एक्सप्रेसखाली आला असता. मात्र चव्हाण यांनी दाखविलेला प्रसंगावधानामुळे संदिप यांचा जीव वाचला आहे. हा सर्व थरारक प्रकार कल्याण स्थानकाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. 

    या प्रकारानंतर चव्हाण यांच्या धाडसाचे कौतुक सर्वत्र होत आहे. अनेक संघटना आणि पक्षाच्या पदाधिका-यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. चव्हाण हे कानसई परिसरात राहत असुन स्थानिक नगरसेवक अपर्णा कुणाल भोईर यांनी त्यांचा सत्कार केला. 

Web Title: The incident occurred at the Kalyan station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.