ट्रान्सफॉर्मरमधील तेलगळतीमुळे आगीच्या घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:44 AM2021-01-16T04:44:11+5:302021-01-16T04:44:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : एमआयडीसीतील हॉलीएंजल शाळेजवळील ट्रान्सफॉर्मरमधील तेल (वंगण) गळतीमुळे त्याला आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या, ...

Incidents of fire due to oil leakage in the transformer | ट्रान्सफॉर्मरमधील तेलगळतीमुळे आगीच्या घटना

ट्रान्सफॉर्मरमधील तेलगळतीमुळे आगीच्या घटना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : एमआयडीसीतील हॉलीएंजल शाळेजवळील ट्रान्सफॉर्मरमधील तेल (वंगण) गळतीमुळे त्याला आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या, असे स्पष्टीकरण महावितरणने आमदार प्रमोद पाटील यांना शुक्रवारी पत्राद्वारे दिले.

एप्रिल २०२० आणि जानेवारीत लागलेल्या आगीच्या घटनांची चौकशी करण्याच्या मागणीचे पत्र पाटील यांनी महावितरणला दिले होते. त्यानुसार महावितरणने एमआयडीसी भागातील उपकार्यकारी अभियंत्यांना सांगून पाहणी अहवाल देण्यास सांगितले होते. तसेच ट्रान्सफॉर्मर परिसरातील स्वच्छता राखण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. पाहणी अहवालात या ट्रान्सफॉर्मरमधून तेलगळती होत असून, ते तेल जमिनीवर पडून तेथील मातीत मिसळत होते. त्या तेलाने पेट घेतल्याने ट्रान्सफॉर्मरला आगी लागल्याचे महावितरणने म्हटले आहे.

भविष्यात असे अपघात होऊ नयेत, यासाठी तेथे आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी, तेलगळती तत्काळ रोखण्याचे आदेश संबंधितांना दिल्याचे महावितरणच्या कल्याण पूर्व विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले.

दरम्यान, पाटील यांच्या मागणीनंतर महावितरणने आगीचे कारण शोधले आहे. त्यामुळे मूळ तक्रारदार असलेले मिलापनगर वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी राजू नलावडे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

-------------

Web Title: Incidents of fire due to oil leakage in the transformer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.