अधिकचा भरलेला कर आगामी मालमत्ता करात समाविष्ट करा - आ. राजू पाटील

By प्रशांत माने | Published: October 30, 2023 07:34 PM2023-10-30T19:34:19+5:302023-10-30T19:34:34+5:30

मालमत्ता करात ६६ टक्के सवलतीबाबत मुख्यमंत्र्यांचे केले अभिनंदन

Include the excess tax paid in the forthcoming property tax - MLA Raju Patil | अधिकचा भरलेला कर आगामी मालमत्ता करात समाविष्ट करा - आ. राजू पाटील

अधिकचा भरलेला कर आगामी मालमत्ता करात समाविष्ट करा - आ. राजू पाटील

डोंबिवली: पलावा आयटीपी प्रकल्पामधील नागरिकांच्या मालमत्ता करात ६६% सवलत देण्याचा निर्णय सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन मात्र या नागरिकांनी मालमत्ता करापोटी भरलेली अधिकची रक्कम आगामी मालमत्ता करात समाविष्ट करावी अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

पलावा मेगासिटी टाऊनशिपला आयटीपी प्रकल्पाअंतर्गत परवानगी देण्यात आली आहे. या प्रकल्पातील नागरिकांना ज्या प्राथमिक गरजा आहेत ज्या पुरवायच्या आहेत त्या संबंधित उद्योजकाने देणे आवश्यक असते. त्यानुसार त्यांना मालमत्ता करामध्ये ६६% सवलत दिली जाते. हि सवलत देण्याची मागणी राजू पाटील यांनी राज्य सरकारकडे केली होती. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडात २० नोव्हेंबर २०१८ रोजी आयटीपी प्रकल्पामधील नागरिकांना मालमत्ता करात ६६ % सवलत देण्याचे परिपत्रक सरकारने काढले होते.

मात्र या परिपत्रकाची अंमलबजावणी होत नव्हती. आमदार पाटील यांनी महानगरपालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. कारण तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दांगडे हे कार्यरत असतांना त्यांनी खोणी पलावा येथील नागरिकांना मालमत्ता करात सवलत दिली होती. दरम्यान या संदर्भात महापालिकेचे या आधीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मात्र त्यांची निर्णय घेण्याआधीच बदली झाली. या संदर्भात २० जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. या पत्राची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे सांगितले होते. अखेर मुख्यमंत्र्यांनी सोमवारी नागरिकांना ६६ % मालमत्ता करात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन आहे तसेच नागरिकांनी जो अधिकचा कर भरला आहे तो आगामी मालमत्ता करात समायोजित करावा याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

Web Title: Include the excess tax paid in the forthcoming property tax - MLA Raju Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.