कलानी समर्थकांच्या घरावर ‘आयकर’चा छापा; ३९ जणांना तडीपारीच्या नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 01:23 PM2024-11-18T13:23:15+5:302024-11-18T13:23:58+5:30
उल्हासनगर : निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असताना ओमी कलानी यांच्या दोघा समर्थकांच्या घरी आयकर विभागाने रविवारी छापे टाकले. कमलेश ...
उल्हासनगर : निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असताना ओमी कलानी यांच्या दोघा समर्थकांच्या घरी आयकर विभागाने रविवारी छापे टाकले. कमलेश निकम यांच्यासह ३९ जणांवर सीआरपीसी कलम १४४ अंतर्गत निवडणूक काळात पोलिसांनी तडीपारीच्या नोटिसा बजावल्या आहेत.
ओमी यांचे कट्टर समर्थक असलेल्या दोन स्थानिक नेत्यांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकल्याची चर्चा होती. याबाबत निकम यांना विचारले असता, त्यांच्यासह एका समर्थकाच्या घरावर छापा टाकल्याची कबुली दिली.
‘राजकीय हेतूने कारवाई’
- कल्याण ग्रामीणमधून पालांडे, अंबरनाथमध्ये प्रदीप पाटील यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यावर कलानी समर्थक सत्ताधाऱ्यांच्या टार्गेटवर आले आहेत.
- राजकीय हेतूने माझ्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप कमलेश निकम यांनी केला.
- दरम्यान, शांतता प्रस्थापित राहण्यासाठी अनेक गुन्हेगारांनाही नोटीस दिल्याची माहिती पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.