फायर एनओसीसाठी अडवणूक

By admin | Published: February 21, 2017 05:41 AM2017-02-21T05:41:15+5:302017-02-21T05:41:15+5:30

फायर एनओसीत अडवणूक होत असल्याने रुग्णालय चालविणारे डॉक्टर पालिकेच्या कारभारावर प्रचंड नाराज आहेत

Inconvenience to the Fire NOC | फायर एनओसीसाठी अडवणूक

फायर एनओसीसाठी अडवणूक

Next

बदलापूर : फायर एनओसीत अडवणूक होत असल्याने रुग्णालय चालविणारे डॉक्टर पालिकेच्या कारभारावर प्रचंड नाराज आहेत. रूग्णालयांच्या परवान्यांचे वेळेत नूतनीकरण न झाल्यास शहरातील रूग्णसेवाच ठप्प होईल, असा इशारा डॉक्टरांनी दिल्याने हे प्रकरण आता चिघळले आहे. रूग्णसेवा कोलमडली, तर त्याचा फटका आजारी व्यक्ती, गरोदर महिलांना बसू शकतो. ही परिस्थिती लक्षात येताच सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकानेच पालिकेकडे तक्रार केली असून डॉक्टरांची अडवणूक न करण्याची मागणी केली आहे.
सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांना फायरची एनओसी (अग्नीशमन प्रतिबंधक उपायांसंदर्भात ना हरकत) बंधनकारक आहे. त्यासाठी जाणाऱ्या डॉक्टरांच्या अडवणुकीचे काम पालिकेमार्फत केले जाते. नियमानुसार रुग्णालय चालविण्यात येत असूनही कोडी करण्याचे काम फायर विभागामार्फत केले जाते, तसेच एनओसी सहज मिळेल याकडे लक्ष न देता ती त्रासदायक कशी होईल, याचाच विचार पालिकेमार्फत केला जात असल्याचा डॉक्टरांचा आरोप आहे.
बदलापूर शहरात अनेक रुग्णालये अनेक वर्षापासून इमारतींत किंवा गाळयांतून रूग्णसुविधा पुरवतात. या सर्व दवाखाने आणि रुग्णालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण दरवर्षी जिल्हा सिव्हिल सर्जनमार्फत करणे बंधनकारक आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची ना हरकत लागते. लहान रुग्णालयात अग्नीशमन प्रतिबंधक उपाययोजना आखूनही अग्निशमन विभागाची आणि त्याला जोडून पालिकेची रितसर एनओसी दिली जात नाही. काही लहान दवाखान्यांना योग्य त्या सूचना देऊन त्यांना लागलीच एनओसी देणे पालिकेची जबाबदारी आहे. मात्र त्यांना सल्ला आणि सहकार्य करण्याऐवजी त्यांच्या अडवणुकीचेच काम केले जात असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे बदलापुरातील बहुतांशी रुग्णालये आणि मॅटर्निटी होमच्या परवान्याचे नूतनीकरण रखडले आहे. ते न झाल्यास त्यांना दवाखाने, रुग्णालये आणि मॅर्टिनटी होम बंद करावे लागणार आहेत. त्याचा परिणाम शहरातील रु ग्णसेवेवर होऊ शकतो. गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्तींना त्याचा फटका बसू शकतो. नव्या इमारतींना सुरक्षेची साधने उपलब्ध होत आहेत. मात्र जुन्या इमारतीत सुरु असलेल्या रुग्णालयांना नव्याने यंत्रणा उभारणे भाग पडत आहे. डॉक्टर तशी यंत्रणा उभारत असूनही त्यांना एनओसी देण्यास टाळाटाळ केले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हे लक्षात घेऊन पालिकेने नियम सुटसुटीत करत फायर एनओसीबाबत उपाय योजावेत, अशी मागणी नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. या संदर्भात मुख्याधिकारी देविदास पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो झाला नाही. (प्रतिनिधी)

हॉटेलांना वेगळा न्याय
च्फायर एनओसीसाठी डॉक्टरांना कोंडीत पकडण्याऱ्या अग्निशमन विभागाने अनधिकृत हॉटेल आणि हॉटेलचे शेड उभारलेल्या बड्या हॉटेल मालकांना मात्र कोणतीही पाहणी न करताच एनओसी देण्याचे काम केले आहे.
च्अनेक हॉटेलमध्ये आपत्कालीन स्थितीत बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग नसतांनाही त्यांना अशी एनओसी दिली जात आहे. सुरक्षेची साधने नसतांनाही हॉटेलचालकांना आणि मालकांना उघडपणे एनओसी देणारे पालिका प्रशासन रुग्णालयांना मात्र कोंडीत पकडण्याचे काम करत आहे, हा मुख्य आक्षेप आहे.

पालिकेच्या मनमानी कारभाराबद्दल अनेक डॉक्टरांची माझ्याकडे तक्रार आली आहे. त्या तक्रारींच्या आधारे मी प्रशासनाला पत्र देऊन रुग्णालयांना फायर एनओसी देण्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्यास सांगितले आहे. तरीही प्रशासन काम करत नसेल तर आम्ही आंदोलन करू.
- शैलेश वडनेरे,
माजी सभापती आणि नगरसेवक

चिरीमिरी न देणाऱ्यांची कोंडी
च्सध्या ५५ हून अधिक लहान-मोठी रुग्णालये-दवाखाने शहरात सुरु आहेत. नव्याने रुग्णालयांची कामे सुरु आहेत. या रुग्णालयांना नियमित कामकाज करण्यासाठी पालिकेची एनओसी बंधनकारक केली आहे.
च्ती न मिळाल्यास परवाना नूतनीकरणास विलंब लागतो आहे. त्यामुळे काही डॉक्टर आर्थिक व्यवहार करुन एनओसी मिळवित आहेत. काही डॉक्टरांना हा मार्ग अवलंबणे शक्य होत नाही. त्यांची कोंडी होते आहे, असा त्यांचा दावा आहे.

Web Title: Inconvenience to the Fire NOC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.