ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ११३७ रुग्णांची वाढ; ५९ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:43 AM2021-05-21T04:43:12+5:302021-05-21T04:43:12+5:30
ठाणे : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाच्या नव्या एक हजार १३७ रुग्णांची वाढ झाली असून, ५९ जण दगावले. आता जिल्ह्यातील एकूण ...
ठाणे : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाच्या नव्या एक हजार १३७ रुग्णांची वाढ झाली असून, ५९ जण दगावले. आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या पाच लाख पाच हजार ८३७ झाली असून, आतापर्यंत आठ हजार ७०७ मृतांची नोंद करण्यात आली.
ठाणे शहरात नवे २०४ रुग्ण आढळले असून, शहरात आतापर्यंत एक लाख २७ हजार २८६ रुग्ण नोंदले आहेत. आठ मृत्यू झाल्यामुळे मृतांची एकूण संख्या एक हजार ८३७ झाली. कल्याण- डोंबिवलीला नवे २७७ रुग्ण आढळून आले असून, २३ मृत्यू झाले. या शहरात आता एक लाख ३१ हजार ३१ बाधित असून, एक हजार ७६८ मृतांची नोंद झाली.
उल्हासनगरला १९ नवे रुग्ण आढळले असून, एकही मृत्यू नाही. या शहरात १९ हजार ८८१ बाधित असून, एकूण मृत्यूसंख्या ४७३ नोंदली आहे. भिवंडीला १५ रुग्ण सापडले असून, दोन मृत्यू झाले आहेत. येथे दहा हजार २७४ बाधितांची, तर ४२७ मृतांची नोंद झाली. मीरा भाईंदरला १५२ रुग्ण सापडले असून, आठ मृत्यू झाले. शहरात आतापर्यंत ४७ हजार ६९५ बाधितांसह एक हजार २२४ मृतांची नोंद आहे.
अंबरनाथ शहरात १६६ नवे रुग्ण सापडले आहेत. तर, दोन मृत्यू झाले. शहरात आता १९ हजार ४३ बाधितांसह मृतांची संख्या ३९८ झाली आहे. बदलापूरला नवे ४३ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधित रुग्णसंख्या २० हजार २२८ असून, एकही मृत्यू नसल्याने एकूण मृत्यूची संख्या २३३ आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात १५१ रुग्ण सापडले असून, दहा मृत्यू झाले आहेत. या गावपाड्यांत ३३ हजार ५२१ बाधित झाले असून, एकूण मृत्यू ८२२ नोंदले आहेत.
...........
वाचली