ठाण्यात आज 1326 कोरोनाबाधितांची वाढ; 39 जणांचा मृत्यूची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 08:13 PM2020-08-26T20:13:36+5:302020-08-26T20:13:41+5:30
ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महापालिकेत 494 रुग्णांसह 9 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.
ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढती संख्या नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत होते. रविवार, सोमवारपाठोपाठ मंगळवारी हि जिल्ह्यात बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. मात्र बुधवारी पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढी झाली . बुधवारी जिल्याहत 1326 रुग्णांसह 39 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या एक लाख 17 हजार 739 तर, मृतांची संख्या आता तीन हजार 386 झाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महापालिकेत 494 रुग्णांसह 9 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या 27 हजार 412 तर, मृतांची संख्या 582 वर गेली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 287 रुग्णांची तर, 6 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 24 हजार 214 तर, मृतांची संख्या 556 वर पोहोचली आहे. ठाणे महानगर पालिका हद्दीत 193 बाधितांची तर, 8 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांची संख्या 24 हजार 906 तर, मृतांची संख्या 807 वर गेली आहे.
मीरा भाईंदरमध्ये 114 रुग्णांची तर, 6 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 11 हजार 874 तर, मृतांची संख्या 409 इतकी झाली आहे. तर, भिवंडी महापालिका क्षेत्रात 21 बधीतांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची तर एकाच मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 4 हजार ११० झाली. तसेच उल्हासनगर 38 रुग्णांची तर, 2 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 7 हजार 649 तर, मृतांची संख्या 219 झाली आहे. अंबरनाथमध्ये 33 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 4 हजार 766 झाली. बदलापूरमध्ये 48 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 3 हजार 915 झाली. तसेच, ठाणे ग्रामीण भागात 98 रुग्णांची तर, 7 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 8 हजार 893 तर, मृतांची संख्या 283 वर गेली आहे.