कल्याण डोंबिवलीत नव्या 363 रुग्णांची वाढ; गेल्या २४ तासांत 11 जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 06:22 PM2020-08-30T18:22:45+5:302020-08-30T18:22:53+5:30
सद्यस्थितीला 3 हजार 192 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात 372 जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
कल्याण: कल्याणडोंबिवलीत कोरोना रूग्णांची संख्या वाढतच आहे. रविवारी कोरोनाचे 363 नवे रूग्ण आढळुन आले तर चोवीस तासात अकरा जणांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत केडीएमसीच्या हद्दीत एकूण 28 हजार 637 जणांना कोरोनाची बाधा झाली असून यातील 24 हजार 825 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर आतार्पयत एकूण 620 जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढावला आहे. सद्यस्थितीला 3 हजार 192 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात 372 जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
महापालिका क्षेत्रात नवीन आढळुन आलेल्या रूग्णांचा आढावा घेता कल्याण पूर्वेत 55, कल्याण पश्चिममध्ये 100, डोंबिवली पूर्वेत 117, डोंबिवली पश्चिमेला 63, मांडा टिटवाळयात 19, मोहना 08 आणि पिसवली 01 असे 363 रूग्ण आढळुन आले आहेत.