जिल्ह्यात कोरोनाच्या ८८७ रुग्णांची वाढ, ६१ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:36 AM2021-05-22T04:36:41+5:302021-05-22T04:36:41+5:30
ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ८८७ रुग्ण शुक्रवारी आढळले. तर गेल्या २४ तासांत ६१ जणांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. ...
ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ८८७ रुग्ण शुक्रवारी आढळले. तर गेल्या २४ तासांत ६१ जणांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख सात हजार ३१६ बाधित व आठ हजार ७६८ मृतांची नोंद करण्यात आली आहे.
ठाणे शहर परिसरात १६९ रुग्णांची वाढ होऊन नऊ जणांचा मृत्यू झाला. यासह शहरात एक लाख २७ हजार ४५५ रुग्णांसह एक हजार ८४६ मृतांची नोंद झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत २१५ रुग्ण सापडले असून २२ मृत्यू झाले आहेत. यामुळे येथे आता एक लाख ३१ हजार २४६ बाधितांसह एक हजार ७९० मृतांची नोंद झाली आहे.
उल्हासनगरमध्ये १७ रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरातल्या एकूण १९ हजार ८९८ रुग्णांसह ४६४ मृत्यू नोंदले आहे. भिवंडीत १२ रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. येथील रुग्णांची संख्या १० हजार २८६ व ४२८ मृत्यू नोंदले आहेत. मीरा-भाईंदरला दिवसभरात १२७ बाधितांसह सात मृत्यू झाल्याचे उघड झाले. या शहरात आतापर्यंत ४५ हजार ८२२ बाधित व एक हजार २३१ मृतांची नोंद करण्यात आली.
अंबरनाथला २८ बाधित सापडले असून तिघांचा मृत्यू झाला. येथील एकूण रुग्णसंख्या १८ हजार ७१ बाधित व ४०१ मृत्यू झाले आहेत. कुळगांव-बदलापूर नगरपरिषद क्षेत्रात ४४ रुग्णांची वाढ होऊन एकही मृत्यू नाही. या शहरातील २० हजार २७२ बाधितांची व २३३ मृतांची नोंद झाली. ग्रामीण गांवपाड्यांत १३६ रुग्णांसह नऊ मृत्यू झाल्याचे आढळून आले. या परिसरातील बाधितांची संख्या ३४ हजार २४९ व ८३१ मृत्यू नोंदले गेले आहेत.