CoronaVirus उल्हासनगरात कोरोनाच्या रुग्णात वाढ, एकूण संख्या १६
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 03:26 PM2020-05-05T15:26:52+5:302020-05-05T15:26:57+5:30
कॅम्प नं-४ संभाजी चौक येथे राहणारा मुंबई पोलीस सेवेतील पोलिसांसह कुटुंबातील ५ सदस्यांना कोरोना झाला.
उल्हासनगर : शहरात सोमवारी ४ तर मंगळवारी दोन कोरोना रुग्ण आढळल्याने एकून कोरोना रुग्णाची संख्या १६ झाली. त्यापैकी २ रुग्ण ठणठणीत बरे झाले असून १३ जनावर कोरोना रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. उल्हासनगर कोरोना मुक्त शहराची असणारी ओळख आठ दिवसात मोडीत निघाली असून शहरात कोरोना रुग्णाची संख्या १६ झाली.
याप्रकाराने पालिका प्रशासनाने चिंता व्यक्त केली. कॅम्प नं-४ संभाजी चौक येथे राहणारा मुंबई पोलीस सेवेतील पोलिसांसह कुटुंबातील ५ सदस्यांना कोरोना झाला. त्यापाठोपाठ मुंबई धारावी येथे खाजगी क्लिनिक मध्ये मराठा सेक्शन येथील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासह त्याच्या कुटुंब व संपर्कातील ५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने कोरोना रुग्णाची संख्या दोन दिवसात १० झाली. त्यापाठोपाठ एका ८७ वर्षीय महिलेचा मुत्यु कोरोनाने झाल्याचे उघड होवून तीच्या ६० वर्षीय मुलाला कोरोना झाल्याचे उघड झाले. तसेच कॅम्प नं-३ शांतीनगर येथील मुंबई पोलीस सेवेतील पोलिसाला कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी उघड होवून रुग्णाची एकून संख्या १६ झाली आहे.
शहरातील एकूण १६ पैकी २ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून एका महिलेचा मृत्यू झाला. तर ११ जनावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी कोरोणाचे हॉटस्पॉट ठरलेले परिसर प्रतिबंधात्मक घोषित करून सीलबंद केले आहे.