शेतक-यांना कर्जमाफीसाठी अर्ज भरण्यास मुदत वाढ!

By सुरेश लोखंडे | Published: March 6, 2018 02:59 PM2018-03-06T14:59:08+5:302018-03-06T14:59:08+5:30

ठाणे व पालघर जिल्ह्यात दु:खत घटनेमुळे, जेल झाल्यामुळे, अपघातग्रस्त असल्यामुळे, ऑनलाइन अर्ज दाखल करता न आल्यामुळे आदी विविध कारणास्तव पात्र असलेल्या शेतक-यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज दाखल करता आलेला नाही. या शेतक-यांची दखल घेऊन त्यांना पुन्हा ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी मिळाली

Increase deadline for farmers to apply for forgiveness! | शेतक-यांना कर्जमाफीसाठी अर्ज भरण्यास मुदत वाढ!

शेतक-यांना कर्जमाफीसाठी अर्ज भरण्यास मुदत वाढ!

googlenewsNext
ठळक मुद्देपात्र शेतक-याना 31 मार्चर्पयत ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची संधी विविध कारणास्तव पात्र असलेल्या शेतक-यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज दाखल करता आलेला नाहीशेतक-यांनी आपले सरकार सेवा केंद्र किंवा स्व:त पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी

ठाणे : पात्र असूनही विविध कारणास्तव काही शेतक-याना कर्जमाफीसाठी अर्ज दाखल करता आला नाही, अशा पात्र शेतक-याना 31 मार्चर्पयत ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची संधी प्राप्त झाली आहे. यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतक-यांनी आपले सरकार सेवा केंद्र किंवा स्व:त पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी शेतक-यांना आहे.
ठाणे व पालघर जिल्ह्यात दु:खत घटनेमुळे, जेल झाल्यामुळे, अपघातग्रस्त असल्यामुळे, ऑनलाइन अर्ज दाखल करता न आल्यामुळे आदी विविध कारणास्तव पात्र असलेल्या शेतक-यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज दाखल करता आलेला नाही. या शेतक-यांची दखल घेऊन त्यांना पुन्हा ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा लाभ जिल्ह्यातील शिल्लक असलेल्या जास्तीत जास्त ३०० शेतक-यांना होण्याची शक्यता ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेच अध्यक्ष राजेंद्र पाटील व उपाध्यक्ष भाऊ कु:हाडे यांनी लोकमतला सांगितले.
शासनाने जाहीर केलेल्या या कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत 22 सप्टेंबर रोजी संपली आहे. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाची विविध पध्दतीने तपासणी करून ठाणे व पालघर जिल्ह्यातील 34 हजार 37० शेतक-यांना 112 कोटी 36 लाख 32 हजार रूपये कर्जमाफी मिळाली आहे. ०नियमित भरणा करणा:या शेतक-यांसह थकबाकीदार शेतक-यांपैकी ठाणे जिल्ह्यातील 17 हजार 746 शेतकरी आहेत. त्यांना 55 कोटी 18 लाख 86 हजार रूपये तर पालघरच्या 16 हजार 624 शेतक:यांना 57 कोटी 17 लाख 45 हजार रूपये कर्जमाफीचा लाभ झाल्याचे टीडीसीसी बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी भगिरथ भोईर यांनी सांगितले.
दीड लाखार्पयत थकबाकीदार 18 हजार 991 शेतक:यांना 85 कोटी 94 लाख 4० हजार प्राप्त झाले. तर नियमित भरणा करणा:या 15 हजार 176 शेतक-यांनाही 24 कोटी सात लाख 37 हजार रूपयांचा लाभ झाला आहे. याशिवाय दीड लाख रूपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या 2०3 शेतक-यांच्या बँक खात्यात देखील 23 कोटी 45 लाख 43 हजार रूपये जमा झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

Web Title: Increase deadline for farmers to apply for forgiveness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.