ठाण्यातील हवेतील प्रदुषणात वाढ, शहरातील हवा अतिप्रदुषीत गटात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 03:53 PM2022-12-13T15:53:48+5:302022-12-13T15:54:04+5:30
मुंबईतील हवी प्रदुषीत झाली असतांनाच आता ठाण्यातील हवा देखील प्रदुषीत होत असल्याचे दिसत आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास शहरातील हवेची गुणवत्ता अतिप्रदुषीत गटात मोडल्याचे दिसून आले आहे.
ठाणे : मुंबईतील हवी प्रदुषीत झाली असतांनाच आता ठाण्यातील हवा देखील प्रदुषीत होत असल्याचे दिसत आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास शहरातील हवेची गुणवत्ता अतिप्रदुषीत गटात मोडल्याचे दिसून आले आहे. शहरातील हवा १०१.५५ टक्के प्रदुषित आढळली आहे. मागील काही दिवसापासून ठाण्यातही काही भागात सकाळ किंवा दुपारचे वातावरण प्रदुषित झाल्याचे दिसत आहे. त्यातही ठाण्यातील वाहनांची दिवसभर वर्दळ असलेला तीनहात नाका परिसर देखील अतिप्रदुषणीत गटात मोडला असल्याचे दिसून आले. तीनहात नाका परिसरात वाहनांची वर्दळ आणि बाजूलाच सुरु असलेल्या मेट्रोच्या कामामुळे हवा प्रदुषित झाल्याचे दिसून आले आहे.
मागील काही दिवसात मुंबई पाठोपाठ आता ठाण्यातही हवेतील प्रदुषणात वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. मागील काही दिवस सकाळच्या सत्रत ढगाळ वातावरण तसेच धुक्याचे वातावरण दिसत होते. मात्र शहरातील प्रदुषणाची पातळी तपासली असता ठाण्याची हवा देखील दुषीत झाल्याचे दिसून आले आहे. शहराची एकूणच प्रदुषणाची पातळी पाहली असता, ती १०१.५५ टक्के म्हणजेच अतिप्रदुषीत आढळून आली आहे.
मंत्री गिरीश महाजनांनी अतिरिक्त Y+ सुरक्षा नाकारली; पोलीस महासंचालकांना पत्र
तीन हात नाका परिसर देखील अतिप्रदुषित गटात मोडला असून येथील हवा प्रदुषण १५४.७८ टक्के एवढी आढळून आली आहे. येथील हवेतील धुलीकणातही वाढ झाल्याचे दिसत आहे. या भागात सध्या वाहनांची वर्दळ वाढली असून तसेच या भागात मागील काही वर्षापासून मेट्रोचे काम सुरु आहे, त्यामुळे येथील प्रदुषणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. शहरातील महत्वाच्या १६ चौकांमधील प्रदूषणाची मोजणी ही या अंतर्गत केली जाते. त्यानुसार शहरातील प्रदूषणाचे प्रमाण हे १०१.५५ टक्के आढळून आले आहे. औद्योगिक परिसरातील रेप्टाकॉस ब्रेट अॅण्ड कंपनी अंतर्गत वागळे इस्टेट शास्त्नी नगर आदी ठिकाणीही हवेतील प्रदूषणाही काहीसे वाढले असून येथे तर ६९.८३ टक्के हवा प्रदूषित आढळली आहे.
तर निवासी परिसर असलेल्या कोपरी प्रभाग कार्यालय अर्थात रहिवास क्षेत्रतही हवा अतिप्रदुषित आढळली असून येथील हवेची गुणवत्ता १००.६७ टक्के आढळली आहे. व्यावसायिक परिसर असलेल्या शाहू मार्केट नौपाडा परिसरातील हवा देखील अतिप्रदुषीत आढळली असून येथील प्रमाण हे ८०.९२ टक्के एवढे आहे. प्रदूषण विभागामार्फत हवेतील दर्जा तापसण्याबाबत चार गट केलेले आहेत. यात हिरवा, पिवळा, नारंगी आणि लाल या रंगाचा समावेश आहे. त्यात हिरवा रंग अतिशुद्ध हवा म्हणून नोंद होते. तर पिवळ्या रंगात मध्यम शुद्ध नारंगी रंगात प्रदूषित तर लाल रंग असलेला परिसर अतिप्रदूषित गटात मोडतो.