मारहाण प्रकरणी चौघाच्या पोलीस कोठडीत वाढ : दिलासा नाही
By जितेंद्र कालेकर | Published: February 17, 2023 05:09 PM2023-02-17T17:09:20+5:302023-02-17T17:09:28+5:30
महेश आहेर यांना केलेल्या मारहाण प्रकरणात ठाणे न्यायालयाने 20 फेब्रुवारी पर्यंत हेमंत वाणी यांच्यासह चौघांनाही पोलीस कोठडी दिली आहे.
ठाणे- महेश आहेर यांना केलेल्या मारहाण प्रकरणात ठाणे न्यायालयाने 20 फेब्रुवारी पर्यंत हेमंत वाणी यांच्यासह चौघांनाही पोलीस कोठडी दिली आहे.
आरोपी पैकी एक अभिजीत पवार यांच्याकडे असलेले शस्त्र ( बंदूक ) पोलिसांनी हस्तगत न केल्याने पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर
पालिका अधिकारी महेश आहेर यांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी चे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे न्यायालयाने अटक पूर्व जामीन शुक्रवारी मंजूर केला आहे.याप्रकरणी आव्हाड यांच्यासह सात जणाविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
शुक्रवारी सकाळी आव्हाड यांच्या वकिलांनी अटक पूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्या नंतर काही अटी शर्थीवर आव्हाड यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे.