ठाणे जिल्ह्यातील ७२ तलावातील गाळ काढून पाणी साठवण क्षमतेत हाेणार वाढ

By सुरेश लोखंडे | Published: May 27, 2023 04:42 PM2023-05-27T16:42:07+5:302023-05-27T16:42:27+5:30

पाण्याचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पाणी हेच जीवन आहे. प्रत्येक गावाला पिण्यासाठी, शेतीसाठी तसेच पशूंसाठी सातत्याने पाण्याची गरज असते.

Increase in water storage capacity by removing silt from 72 lakes in Thane district | ठाणे जिल्ह्यातील ७२ तलावातील गाळ काढून पाणी साठवण क्षमतेत हाेणार वाढ

ठाणे जिल्ह्यातील ७२ तलावातील गाळ काढून पाणी साठवण क्षमतेत हाेणार वाढ

googlenewsNext

ठाणे : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अंतर्गत होणाऱ्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि जल जीवन मिशन योजनेच्या जनजागृतीसाठी प्रचार रथ जिल्हा दाैर्यावर जात आहे. या रथाला अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये यांनी हिरवा झेंडा दाखवून या प्रचार यात्रेचा शुभारंभ केला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्य प्रांगणात हा प्रचार यात्रा शुभारंभ साेहळा पार पडला. यावेळी विभागीय वन अधिकारी कांचन पवार, उपजिल्हाधिकारी दिपक चव्हाण, तहसिलदार राजाराम तवटे, ठाणे जिल्हा परिषदचे जिल्हा जलसंधारण अधिकारी दिलीप जोकार, वसुंधरा संजीवनी मंडळ संस्थापक आनंदजी भागवत आदी उपस्थित होते. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतंर्गत पहिल्या टप्यात ठाणे जिल्हयातील कल्याण,अंबरनाथ,मुरबाड,शहापूर भिवंडी या तालुक्यातील ७२ तलावातील गाळ काढण्यात येत आहे.

पाण्याचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पाणी हेच जीवन आहे. प्रत्येक गावाला पिण्यासाठी, शेतीसाठी तसेच पशूंसाठी सातत्याने पाण्याची गरज असते. हवामानामध्ये तीव्र गतीने बदल होत चालले आहेत. पाऊस पडणे बेभरवशाचे झाले आहे. या संकटाला सामोरे जायचे असेल, तर प्रत्येक गावाने पाण्यासाठी आत्मनिर्भर होण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. यास अनुसरून प्रत्येक गाव, तालुक्यामध्ये पाणी साठविण्यासाठी विहिरी, गाव तलाव, पाझर तलाव तसेच लहान-मोठे तलाव व धरणे आणि तलावांमधील गाळ काढून पाणी साठविण्याची क्षमता वाढवण्याची गरज आहे.

'जलयुक्त शिवार, 'जल जीवन मिशन या योजनांच्या माध्यमातून कामे सहजरीतीने करता येऊ शकतात. यासाठी ग्रामपंचायतींना व पाणी समित्यांना योग्य ते प्रशिक्षण देऊन सक्षम केल्यास, आपल्या परिसरातील सर्व तलावांचा गाळ प्रशासनाच्या माध्यमाने काढला जाऊ शकतो व निगा राखण्याचे कायमस्वरूपाचे काम केले जाऊ शकते. ज्या ग्रामपंचायती आपले गाव 'जल-आत्मनिर्भर' करण्यासाठीची ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार असतील, अशा ग्रामपंचायतीकडून https://bjsindia.org/mwsd किंवा https://gf3f4aec40f890c-appprod.adb.ap-mumbai-1.oraclecloudapps.com/ords/r/mission100/mission100/login मागणी अर्ज मागविण्यात येत आहेत.
 

Web Title: Increase in water storage capacity by removing silt from 72 lakes in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.