कल्याण-कसारा, कर्जत लोकल फेऱ्या वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:49 AM2021-09-08T04:49:16+5:302021-09-08T04:49:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कल्याण ते कसारा व कल्याण-कर्जत लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करावी, या मार्गावरील तसेच जळगाव जिल्ह्यातील ...

Increase Kalyan-Kasara, Karjat local rounds | कल्याण-कसारा, कर्जत लोकल फेऱ्या वाढवा

कल्याण-कसारा, कर्जत लोकल फेऱ्या वाढवा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कल्याण ते कसारा व कल्याण-कर्जत लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करावी, या मार्गावरील तसेच जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवाव्यात, रेल्वे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सीएसटी ते पंढरपूर ही सांगोला एक्स्प्रेस सुरू करावी, या मागण्यांसाठी मंगळवारी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली.

यावेळी कल्याण-कसारा व कर्जत तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचे काम तातडीने पूर्ण करणे, कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्प मार्गी लावावा, आसनगाव महत्त्वाचे स्थानक असल्याने तेथे होम प्लॅटफॉर्म उभारावा, जीआरपी चौकी प्रत्येक स्थानकात असावी, या मागण्यांबाबतही चर्चा करण्यात आली.

२००४ पूर्वी नियुक्त केलेल्या मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू करावी, ठाणे जिल्ह्यातील हजारो खान्देशातील प्रवाशांच्या मागणीवरून मुंबई-भुसावळ एक्स्प्रेस सुरू करावी, सीएसटी ते पंढरपूर-सांगोला एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत पवार यांनी चर्चा केली. या मागण्यांवर सकारात्मक विचार करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दानवे यांनी दिले. या चर्चेत रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या हेरिटेज सभागृहात झालेल्या चर्चेत पवार यांच्यासमवेत भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मिहिर देसाई, कुंदा चंदणे, अरुणा गोखले आदी उपस्थित होते.

------------------

Web Title: Increase Kalyan-Kasara, Karjat local rounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.