भिवंडी लोकसभेत तीन महिन्यात ७८ हजार ८५९ मतदारांची वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 08:52 PM2024-05-09T20:52:49+5:302024-05-09T20:53:11+5:30

आता २० लाख ८७ हजार २४४ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

Increase of 78 thousand 859 voters in Bhiwandi Lok Sabha in three months | भिवंडी लोकसभेत तीन महिन्यात ७८ हजार ८५९ मतदारांची वाढ 

भिवंडी लोकसभेत तीन महिन्यात ७८ हजार ८५९ मतदारांची वाढ 

नितीन पंडित, भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदार संघात मतदार नाव नोंदणीसाठी २३ एप्रिल पर्यंत वेळ वाढवून दिल्याने या संधीचा फायदा घेत या तीन महिन्यांच्या काळात भिवंडी लोकसभा क्षेत्रात ७८ हजार ८५९ मतदारांनी नावनोंदणी केली आहे. त्यामुळे आता २० लाख ८७ हजार २४४ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

२३ जानेवारी रोजी २० लाख ८ हजार ३८५ मतदार नोंद होती.त्यानंतर २३ एप्रिल पर्यंत कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक २२ हजार ७५६ मतदारांची नोंद झाली.त्या पाठोपाठ भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रात १८ हजार ७५६,भिवंडी पश्चिम मध्ये १२ हजार ८५२,मुरबाड विधानसभा क्षेत्रात ११ हजार ३१३,भिवंडी ग्रामीणमध्ये ८ हजार ८२३ तर शहापुर विधानसभा क्षेत्रात ४ हजार ३५१ मतदारांची वाढ झाली आहे.या मतदार वाढीचा फायदा नेमकी कोणाला मिळतो हे पाहणे मोठे महत्वाचे ठरणार आहे.

मतदार वाढी नंतर मुरबाड विधानसभा मतदार संघात ४ लाख ४२ हजार ९२२,कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात ४ लाख १३८,भिवंडी पूर्व विधानसभा ३ लाख ३६ हजार ११०,भिवंडी पश्चिम विधानसभा-३ लाख ४ हजार ९५९,भिवंडी ग्रामीण विधानसभा ३ लाख २३ हजार ९७८,शहापुर विधानसभा २ लाख ७९ हजार १३७ असे एकूण २० लाख ८७ हजार २४४ मतदार नोंदविले गेले आहेत.या मध्ये स्त्री मतदार ९ लाख ५७ हजार १९१ तर पुरुष मतदार ११ लाख २९ हजार ७१४ असून व ३३९ इतर मतदारांचा समावेश आहे .

Web Title: Increase of 78 thousand 859 voters in Bhiwandi Lok Sabha in three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे