सोने चोरी प्रकरणात मालकाच्या अडचणीत वाढ; विमा कंपनीकडून भरपाई मिळणे अवघड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 09:56 PM2017-10-09T21:56:58+5:302017-10-09T21:57:01+5:30

अंबरनाथ मधील सागर ज्वेलर्स या दुकानातून रविवारी दुपारी 8.5 किलो सोने चोरटय़ांनी लंपास केले. दुकानाच्या मालकाने दुकानातील सोन्याचा विमा कंपनीकडुन विमा काढुन ठेवला होता.

Increase in owner's troubles in gold theft case; It is difficult to get compensation from the insurance company | सोने चोरी प्रकरणात मालकाच्या अडचणीत वाढ; विमा कंपनीकडून भरपाई मिळणे अवघड

सोने चोरी प्रकरणात मालकाच्या अडचणीत वाढ; विमा कंपनीकडून भरपाई मिळणे अवघड

Next

अंबरनाथ : अंबरनाथ मधील सागर ज्वेलर्स या दुकानातून रविवारी दुपारी 8.5 किलो सोने चोरटय़ांनी लंपास केले. दुकानाच्या मालकाने दुकानातील सोन्याचा विमा कंपनीकडुन विमा काढुन ठेवला होता. मात्र विमा कंपनीकडुन त्याला भरपाई मिळणो अवघड झाले आहे. दुकानातील सोने लॉकरमधून चोरीला गेल्यावरच विमा भरपाई मागता येते. मात्र दुकानातील सर्व सोने हे काचेतच ठेवलेले असल्याने विमा कंपनी या प्रकरणात हात वर करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

अंबरनाथ शिवाजी चौकातील सागर ज्वेलर्स या दुकानात रविवारी दुपारी 2.3क् ते 4 च्या दरम्यान काही चोरटय़ांनी दुकानाच्या मागच्या दाराने दुकानात प्रवेश केला. यावेळी दुकानात शिरलेल्या चोरटय़ाने दुकानाच्या काचेच्या शोकेसमध्ये सजविलेले सोन्याचे दागिने चोरले. या प्रकरणात शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन सोन्याचे मोजमाप केल्यावर दुकानातील 8 किलो 300 ग्राम सोने चोरीला गेल्याचे समोर आले आहे. तर दोन लाख किमतीचे शुध्द चांदीचे बिस्कीट देखील चोरीला गेले आहे. या दुकानात शोकेसमध्ये ठेवलेले सर्व सोने चोरटय़ांनी लंपास केल्याचे ज्वेलर्सचे मालक महेंद्र जैन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दुकानातील सोन्याचा विमा असुन देखील त्याचा फायदा होणार नाही. ज्वेलर्सच्या दुकानातील सोन्याचा वीमा काढतांना काही ठळक बाबी निश्चित करण्यात आलेले असतात. त्यातील महत्वाचे म्हणजे रात्री दुकान बंद झाल्यावर दुकानातील लोखंडी लॉकरमध्ये सर्व सोने ठेवणो गरजेचे असते. लॉकर तोडुन सोने चोरले गेल्यावर वीमा भरपाई होते. कारण दुकानातील लॉकर आणि त्याची सुरक्षा पाहुनच वीमा कंपनी सोन्याचा विमा काढत असते. तर दुस-या एका प्रकरणात दुकानात जर दरोडा पडला तर सोन्याचा विमा भरपाई मिळते. मात्र सागर ज्वेलर्स दुकानात शोकेसमध्ये ठेवलेले दागिने लंपास केल्याने वीमा भरपाईचा मार्ग बंद होणार आहे.

दरम्यान या प्रकरणाती अधिक माहिती घेतली असता. चोरटय़ांपैकी एका चोरटय़ानेच दुकानात प्रवेश केला. इतर त्याचे साथिदार हे दुकानाबाहेर पहारा देत होते. दुकानात शिरलेला चोरटय़ाने सुरुवातील तोंडाला मास्क लावला होता. त्यामुळे त्याची ओळख पटणो शक्य नव्हते. मात्र याच चोरटय़ाने सोने चोरल्यावर दुकानातील सीसीटीव्हीचा डिव्हिआर बंद करण्याचा प्रय} केला. डिव्हीआर येवजी चोरटय़ाने घाईत संगणकाचा प्लग काढला. सीसीटीव्ही बंद झाले असले असे समजुन त्याने तोंडावरील मास्क काढुन टाकला. त्याचवेळी त्याचा चेहरा कॅमे-यात कैद झाला.दुसरी महत्वाची बाब म्हणजे दुकानातील सीसीटीव्हीची पाहणी करण्यासाठी जैन यांनी मोबाईलमध्ये देखील सुविधा तयार केली होती. मात्र योगा योगाने जैन यांनी आपले दोन्ही मोबाईल देखील दुकानातच चार्जिगसाठी ठेवले होते. ते मोबाईल देखील चोरटय़ांनी लंपास केले आहे. 

Web Title: Increase in owner's troubles in gold theft case; It is difficult to get compensation from the insurance company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा