ठाण्यात युद्धपातळीवर अँटीजन टेस्टिंगचा दर वाढवा; रुग्णांचे २० टक्के प्रमाण चिंताजनक : नारायण पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 03:39 PM2020-07-24T15:39:52+5:302020-07-24T15:39:52+5:30
महापालिकेच्यावतीने नऊ प्रभाग समितीअंतर्गत कोरोना रुग्णांच्या रॅपिड अँटीजन किटसच्या माध्यमातून चाचणी केल्या जात आहेत.
ठाणे : आतापर्यंत ठाणे महापालिकेच्या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांचे आढळलेले २० टक्क्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. यावर वेळीच मात करण्यासाठी महापालिकेच्या ताब्यातील एक लाख अँटीजन टेस्ट किटच्या सहाय्याने युद्धपातळीवर अँटीजन टेस्टिंग कराव्यात, याकडे भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधले आहे.
महापालिकेच्यावतीने नऊ प्रभाग समितीअंतर्गत कोरोना रुग्णांच्या रॅपिड अँटीजन किटसच्या माध्यमातून चाचणी केल्या जात आहेत. त्यासाठी ९ ठिकाणी चाचणी केंद्रे सुरू करण्यात आली. या केंद्रात पहिल्या तीन दिवसांत सुमारे एक हजार ५७१ चाचणी करण्यात आल्या आहेत. त्यात ३३१ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले. केलेल्या चाचण्यांमध्ये २० टक्क्यांचे प्रमाण चिंताजनक आह, असे पवार यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
महापालिकेच्या ताब्यात आता एक लाख अँटीजन टेस्टिंग किट आहेत. तर ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. शहरातील चाळी व झोपडपट्टीत राहणाऱ्या सामान्य नागरिकांना कोरोना चाचणीचा खर्च परवडणारा नाही. गेल्या चार महिन्यांपासून आर्थिक फटका बसल्यामुळे मध्यमवर्गीयांचे बजेटही कोलमडलेले आहे. त्यामुळे स्वखर्चाने चाचणीसाठी पुढे येणाऱ्या नागरिकांची संख्या अत्यल्प आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात महापालिकेने युद्धपातळीवर चाचण्या सुरू कराव्यात. त्यातील पॉझिटिव्ह रुग्णांबरोबरच कुटुंबियांचे अलगीकरण करण्यावर भर द्यावा, अशी मागणी नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे. शहरातील झोपडपट्टी व चाळी असलेल्या क्षेत्रात जास्तीत जास्त चाचणी केंद्रे उघडण्याची मागणीही श्री. पवार यांनी केली आहे.
आणखी बातम्या...
CoronaVirus News : कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या महिलेला अटक
इराणच्या पॅसेंजर विमानाजवळ आली दोन अमेरिकन लढाऊ विमाने, थोडक्यात मोठा अपघात टळला
"छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता"
बापरे! पत्नीचे 14 जणांसोबत शारीरिक संबंध; पतीने पाठवली सर्वांना कायदेशीर नोटीस अन्...
मृत्यूनंतरही आठ लोकांसाठी ठरला फरिश्ता; २७ वर्षीय तरुणाचे अवयवदान