भाड्याने वाहन नेताय किमीमागे दोन रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:47 AM2021-08-18T04:47:31+5:302021-08-18T04:47:31+5:30
स्टार १०५५ अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडल्याने सर्व जिल्ह्यांत खासगी प्रवासी ...
स्टार १०५५
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडल्याने सर्व जिल्ह्यांत खासगी प्रवासी वाहनचालक, मोटारी, जीप, टेम्पो आदी वाहन भाड्याने देणारे ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी आपले दर वाढविले आहेत. त्यामुळे विशेषतः वाहन करून प्रवास करणाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. महागाईचा भडका उडालेला असताना आता भाड्याने वाहन घेऊन जाताना पूर्वीपेक्षा हजारो रुपये जास्त मोजावे लागत आहेत.
कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका टूर, ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना बसला. अनेकांची वाहने जागेवरच उभी होती, तर कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यावर बंधने होती. आता निर्बंध शिथिल झाले असून, व्यवसाय पूर्वपदावर येऊ लागला आहे. दुसरीकडे वर्षभराने दुकाने आता काहीशी उघडायला लागल्याने गॅरेजचालकही गाडीचे रिपेअरिंग करताना भरपूर पैसे घेत आहेत. वाहने उभी राहिलेली असल्याने खूप काम निघाल्याने वाहनचालक, मालक हैराण आहेत.
--------------------------
असे वाढले पेट्रोल-डिझलेचे दर (प्रतिलिटर)
वर्ष - पेट्रोल-डिझेल
जानेवारी - २०१९- ८०.८७ रु- ६०.०० रु.
जानेवारी २०२०- ८५.४५ रु- ६४.०० रु.
जानेवारी २०२१- ९०.९५ रु-८५.०० रु.
ऑगस्ट २०२१- १०५ रु. ९६.५० रु.
------------
प्रवासी वाहनांचे प्रति कि.मी.दर
अ. चार चाकी- १४ रुपये नॉन एसी
ब. चार चाकी- १५-१६ रुपये एसी
------------------
भाड्याने दिल्या जाणाऱ्या वाहनांचे दर वाढले हे वास्तव आहे, पण इंधनाची दरवाढ हे त्यामागचे कारण आहे. एकदा गाडी पुणे, नाशिक, सोलापूर, नागपूर किंवा कोकण कुठेही जाऊन आली की काहींना काही तांत्रिक काम निघते. त्यात गॅरेजचालक स्पेअर पार्ट्स महाग झाल्याने भाव वाढवून घेतात. त्यामुळे खूप अडचणी येत आहेत. कर्ज काढून ज्यांनी वाहन घेतली त्यांची तर खूप आर्थिककोंडी झाली आहे.
- गौरव खत्री, वाहन भाड्याने देणारे व्यावसायिक