कोरोनाकाळात वाढली चिंता, असुरक्षिततेची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:27 AM2021-06-24T04:27:21+5:302021-06-24T04:27:21+5:30

अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कोरोनाच्या संसर्गामुळे संपूर्ण जग एका मोठ्या संकटात लोटले गेले. एकीकडे या आजारापासून ...

Increased anxiety, feelings of insecurity during the Coronation | कोरोनाकाळात वाढली चिंता, असुरक्षिततेची भावना

कोरोनाकाळात वाढली चिंता, असुरक्षिततेची भावना

googlenewsNext

अनिकेत घमंडी

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कोरोनाच्या संसर्गामुळे संपूर्ण जग एका मोठ्या संकटात लोटले गेले. एकीकडे या आजारापासून बचाव करणे, तर दुसरीकडे आर्थिक विवंचनेतून मार्ग काढणे, अशी दोन मोठी खडतर आव्हाने प्रत्येकापुढे उभी राहिली. मात्र, त्यातून मार्ग काढताना विविध स्तरांवर चिंता, असुरक्षिततेची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. त्यामुळे नैराश्याने ग्रासलेले अनेक जण उपचारांसाठी आल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितले.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात केलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला. त्यामुळे अनेकांचा रोजगार, व्यवसाय गेला. सर्वच व्यवहार ठप्प झाले. दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अनेक महिने नागरिकांना घरात बसावे लागले. आजवर अशा बंधनाची सवय कोणालाच नव्हती. त्यामुळे अचानक आलेल्या या संकटांचा परिणाम समाजातील सर्वच स्तरांमध्ये पाहायला मिळाला. सर्वसामान्य नागरिकांना आधी कोरोना होईल का, याची आणि त्यानंतर नोकरी सुरक्षित राहील का? या चिंतेने ग्रासले होते, तर दुसरीकडे आयसोलेशनमुळे एकटेपणाची भावना नागरिकांमध्ये वाढीस लागल्याचे निरीक्षण शहरातील मानसोपचारतज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ही उदासीनता येणे ही गंभीर बाब आहे, वास्तविक ही अवस्था यायला नको, त्यामुळे वेळीच खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.

डिप्रेशन का वाढले?

- कोरोना का झाला, कसा झाला, याच चिंतेने मुळात आधी नागरिक त्रस्त झाल्याचे लक्षात येत आहे.

- कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला. अनेकांचा व्यवसाय बुडाला. रोजगारही गेला, तसेच अनेकांच्या पगारात कपात झाली. त्यामुळे कामाशी निगडित असुरक्षितता वाढली.

- कोरोना झाल्यावर नातेवाईक, समाज काय म्हणेल, वाळीत टाकेल का, याचाही तणाव नागरिकांच्या मनावर असल्याचे दिसून आले.

--------------------

हे टाळण्यासाठी काय कराल?

- सोशल डिस्टन्स पाळायचे असले तरी मेंटल डिस्टन्स ठेवू नका, म्हणजे काय तर मन मोकळे करा.

- कामाचे नियोजन करावे.

- घरातील कामाची विभागणी करणे गरजेचे.

- वर्क फ्रॉम होम करताना घरातील लहान- मोठ्यांना वेळ देण्यासाठी शेड्यूल बनवा.

- नकारात्मक बातम्या बघण्याऐवजी सकारात्मक बातम्या बघा. सोशल मीडियावर ‘डाएट’ ही संकल्पना राबवून मोबाइलवर जेवढेच तेवढेच बघावे.

-----------------

कोट

कोरोना झाला तरी त्याची चिंता करण्यात वेळ घालवू नये. त्यावर उपाय करून स्वतःला सकारात्मक ऊर्जेत ठेवावे. तणावाचे नियोजन करायला हवे. वेळेवर झोपणे, उठणे, योगासने करणे महत्त्वाचे आहे. घरात लहान मुले, वृद्ध यांची सांगड घालावी. त्यामुळे वाद होत नाहीत, त्याचा त्रास होत नाही. भावना दाबू नका, त्या मोकळ्या करा, बोला, व्यक्त व्हा.

-डॉ. विजय चिंचोले, मानसोपचारतज्ज्ञ

------

कोरोना झालेला असल्यावर बरे झाले की, पुन्हा कोरोना होऊ शकतो का? याची चिंता नागरिकांना असते. त्यात औषधांचा परिणाम की काय, हे माहीत नाही; परंतु चिडचिडेपणा, एकटेपणाची भावना वाढीस लागली होती. आर्थिक विवंचनाही अनेकांना सतावत आहे. यामुळे अन्य रोगांना आमंत्रण देण्याची शक्यता असते. त्यासाठी कोणीही लगेच खचून जाऊ नये. वृद्धांना त्यांच्या मित्रांशी बोलणे करून देण्यासाठी व्हिडिओ कॉल लावा, व्हाॅटस्‌ॲपवर फोटो बघू द्या, असे उपक्रम करून मनमोकळे करू द्या.

-मानसोपचारतज्ज्ञ

--------

मुळात कोरोनाकाळात जरी नागरिक परस्पर औषध मागायला आले, तर ते काय मागत आहेत, हे आम्हाला समजत होते. शासन मार्गदर्शनानुसारच आम्ही औषधे दिली, तसेच डॉक्टरांची चिठ्ठी असली तरच औषध दिली गेली. त्यामुळे सरसकट कोणालाही औषधे दिली गेली नाहीत.

-औषध विक्रेता

-----------

Web Title: Increased anxiety, feelings of insecurity during the Coronation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.