कल्याण डोंबिवलीत चोºया वाढल्या; सोनसाखळी, मोबाइल लांबविण्याचे प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 12:28 AM2017-10-02T00:28:40+5:302017-10-02T00:28:54+5:30
एकीकडे चोरीला गेलेले मोबाइल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असले तरी दुसरीकडे मोबाइल चोरीचे सत्र सुरूच आहे.
डोंबिवली : एकीकडे चोरीला गेलेले मोबाइल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असले तरी दुसरीकडे मोबाइल चोरीचे सत्र सुरूच आहे. त्याचबरोबर सोनसाखळी चोरीमुळे देखील नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या दोन दिवसांत मोबाइल आणि सोनसाखळी चोरीच्या नऊ घटना घडल्या असून स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये दाखल तक्रारीवरून गुन्ह्यांची नोंद होत असली तरी महिला वर्गांत यामुळे घबराटीचे वातावरण आहे.
शुक्रवारी सायंकाळी डोंबिवली पूर्वेकडील सावरकर रोडवर मुलीला क्लासला सोडून घरी परतत असलेल्या ३० वर्षीय महिलेच्या गळ्यातील ३० हजारांची चेन दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने लांबविल्याची घटना घडली. तर दुसºया घटनेत ५७ वर्षीय महिला डोंबिवली रेल्वे स्थानक परिसराकडे पायी जात असताना तिच्या गळ्यातील १५ हजारांची चेन चोरट्याने लांबविली. येथीलच रेल्वे स्थानक परिसरातील एका कपड्याच्या दुकानातून खरेदी करून घरी परतत असलेल्या एका २५ वर्षीय तरुणीच्या पिशवीतील ३० हजारांचा मोबाइल चोरीला गेल्याची घटना घडली. ७० वर्षीय दिलीप गुप्ते हे फडके रोेडवर भाजी घेत असताना त्यांच्या खिशातील ४ हजारांचा मोबाइल लंपास केला. त्यांच्याबरोबर हर्षद इंगळे यांचाही मोबाइल चोरट्यांनी चोरला. या घटनांप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद झाली आहे. टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतीनगर शाळेच्या चौकातही एका ३४ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ६० हजारांची चेन दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. मानपाडा हद्दीतील अडवली परिसरात राहणाºया दिनेश जैस्वार यांचा घरात चार्जिंगला लावलेला मोबाइल खिडकीची स्लाइडिंग उघडून चोरून नेण्यात आला.