भाजपाचा टक्का वाढला?
By admin | Published: February 23, 2017 06:04 AM2017-02-23T06:04:26+5:302017-02-23T06:04:26+5:30
ठाणे महापालिकेच्या सातव्या सार्वत्रिक निवडणुकीत यंदा प्रथमच मागील दोन निवडणुकांचा विक्रम मोडत ५९ टक्के
ठाणे : ठाणे महापालिकेच्या सातव्या सार्वत्रिक निवडणुकीत यंदा प्रथमच मागील दोन निवडणुकांचा विक्रम मोडत ५९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मागील २०१२ च्या निवडणुकीत ५३.२५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. यंदा मात्र सहा टक्के वाढीव मतदान झाले आहे. त्यामुळे आता या वाढीव मतदानाचा फायदा कोणाला होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीत ज्या महत्त्वाच्या भागांमध्ये भाजपाची आगेकूच झाली होती, त्याच प्रभागांमधून मतदानाचा टक्का मागील निवडणुकीच्या तुलनेत वाढल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे या वाढलेल्या मतदानाचा फायदा भाजपाला होणार का, हे आता गुरुवारीच स्पष्ट होणार आहे.
ठाणे महापालिकेच्या सातव्या सार्वत्रिक निवडणुकीत ३३ प्रभागांतील १३१ जागांसाठी झालेल्या मतदानात १२ लाख २८ हजार ६०६ मतदारांपैकी ७ लाख २४ हजार ९०३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये ६ लाख ६७ हजार ५०४ पुरुष मतदारांपैकी ३ लाख ९५ हजार ९३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर, ५ लाख ६१ हजार ८७ महिला मतदारांपैकी ३ लाख २८ हजार ९६२ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. ३३ प्रभागांमध्ये सर्वच ठिकाणी मतदानाचा टक्का मागील निवडणुकीच्या तुलनेत वाढलेला दिसून आला आहे. दरम्यान, २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत ५६.५७ टक्के आणि २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत ५३.२५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. यापूर्वीच्या अनुभवानुसार मतदानाचा टक्का कमी असेल, तर त्याचा फायदा शिवसेनेला झालेला दिसून आला. २००७ आणि २०१२ मध्ये शिवसेनेला बहुमत मिळाले होते. २०१२ मध्ये द्विपॅनल पद्धत होती. यंदा चार पॅनलचा एक वॉर्ड अशी रचना असल्याने या पद्धतीचा फायदा हा शिवसेनेलाच अधिक होईल, असा दावा केला जात आहे. परंतु, आता सहा टक्के वाढलेल्या मतदानामुळे त्याचा काही अंशी परिणाम शिवसेनेला सोसावा लागेल, असेही बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपाला घोडबंदर, ठाण्याचा मध्यवर्ती भाग आणि कोपरीच्या काही भागांतही मतदारांनी मतदानात आघाडी दिली होती. किंबहुना, वाढलेल्या या मतांवरच ठाण्याचा बालेकिल्ला शिवसेनेच्या हातून निसटला होता. आता याच भागांमध्ये मतदानाचा टक्का ५६ ते ६४ टक्क्यांवर गेला आहे. मागील निवडणुकीत याच भागात मतांचा टक्का ४८ ते ५५ आसपास होता. त्यामुळे आता या वाढलेल्या मतदानाचा फायदा भाजपाला होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे. घोडबंदर भागातही प्रभाग क्रमांक १ मध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा ६१.६६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर, हिरानंदानी इस्टेट, पातलीपाडा, ब्रह्मांड, अकबर कॅम्प या परिसरातील प्रभाग क्र. २ मध्येही सुशिक्षित मतदार हा मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसून आले असून येथे ५४.६१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मागील निवडणुकीपेक्षा हे प्रमाण एक टक्क्याने जास्त असले तरीदेखील त्याचा परिणाम काय होऊ शकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याशिवाय, प्रभाग क्र. ४ आणि ५ मध्येही मतदानाचा टक्का वाढला असून येथे अनुक्रमे ५४.८९ आणि ५९.७५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. याशिवाय, प्रभाग क्रमांक ११ मधील मतदानाचा वाढलेला टक्का हा कोणाच्या पथ्यावर पडणार, हे पाहणे महत्त्वाचे असून येथील लढत पूर्वीचा शिवसैनिक आताचा भाजपा आणि शिवसेना अशी झालेली आहे. त्यामुळे येथील मतदानाचा ६२.०८ टक्का हा कोणाला फायदेशीर ठरणार, हे समजणार आहे.
याशिवाय, शहरातील मध्यवर्ती भागातील प्रभाग क्रमांक २१, २२ मध्येही मतदानाचा टक्का अनुक्रमे ६४.६७ आणि ६४.९० टक्के एवढा झाला आहे. तर, कोपरीतील प्रभाग क्रमांक १९ आणि २० प्रभागांत मतदानाची टक्केवारी ही ६० च्या वर गेली आहे. ही टक्केवारी शिवसेनेचे नरेश म्हस्के, विकास रेपाळे, गिरीश राजे, मालती पाटील, भाजपाचे भरत चव्हाण, किरण टिकमानी यांचे भवितव्य निश्चित करणारे आहे. याशिवाय, इतर प्रभागांतही कमीअधिक प्रमाणात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. खासकरून वागळे, किसननगर पट्ट्यातही मतदारांनी सर्वाधिक मतदान केले असून हा भाग शिवसेनेचा म्हणजेच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जात असून याच पट्ट्यातूनही अधिक मतदानाची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)
प्रभाग क्र.एकूण मतदानटक्केवारी
१)१८१०२६१.६६
२)१९३८६५४.६१
३)२२५४६५६.५२
४)१८२०१५४.८९
५)२२०४७५९.७५
६)२८८३०६२.७८
७)२५८०८५७.०४
८)२६१६६५६.२७
९)२३१७८६५.१९
१०)१९३८३६१.१९
११)२३९७९६२.०८
१२)२५२६७६७.२५
१३)२६०५९६२.१५
१४)२५६७१५९.९९
१५)२८६३७५६.४१
१६)२३९५९५५.६३
१७)२५१४०५४.९१
१८)२४४४०५६.२०
१९)२२५४६६०.५४
२०)२८७२०६१.५०
२१)२४८९७६४.६७
२२)२७६५०६४.९०
२३)२७७७७६३.२४
२४)२३७८८६१.७६
२५)१८८८४५६.१६
२६)१९२४७५२.८५
२७)१७०८०६४.३०
२८)१६१९१६६.५०
२९)१४२७७६७.०४
३०)१३९९३४३.०८
३१)१७२९७५३.५३
३२)१३९३०४९.०८
३३)११८२७५३.८३
एकूण७२४९०३५९.००
सर्वाधिक मतदानाची नोंद प्रभाग क्रमांक १२ मध्ये 67.25%एवढी झाली आहे. सर्वात कमी मतदानाची नोंद प्रभाग क्रमांक ३० मध्ये झाली असून येथे 43.08% मतदानाची नोंद झाली आहे. कळव्यात अनुक्रमे ५६ ते ६१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपाचे एकमेव आमदार संजय केळकर यांना घोडबंदर पट्ट्यासह ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणाहून अधिकचे मते मिळाली होती. किंबहुना, अधिकचा टक्का या पट्ट्यातून मिळाला होता.
आता तर याच पट्ट्यामध्ये मतदानाचा टक्का हा 56-67% टक्क्यांपर्यंत आला आहे. त्यामुळे याचा फायदा भाजपाला होणार की शिवसेनेला, किंबहुना वाढलेली मते कोणाची, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मतदानाची टक्केवारी एकूण झालेल्या59% मतदानामध्ये सर्वाधिक मतदानाचा टक्का हा प्रभाग क्रमांक १३ मध्ये वाढल्याचे दिसून आले असून येथे तब्बल 67.25% मतदानाची नोंद झाली आहे. निवडणुकीपासूनच हा वॉर्ड चर्चेत असून या प्रभागात भाजपाचे नारायण पवार यांची लढत ही थेट खासदार राजन विचारे यांच्या उमेदवारांशी आहे. परंतु, आता या प्रभागात मतदानाचा टक्का वाढल्याने त्याचा फायदा भाजपाला अधिक होईल, असा कयास लावला जात आहे. तर, या प्रभागाच्या खालोखाल
67.04% मतदानाची नोंद ही प्रभाग क्र. २९ मध्ये झाली असून या ठिकाणी राष्ट्रवादीचे हिरा पाटील यांच्या पत्नीचे आणि शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांचे अस्तित्व पणाला लागले आहे. दुसरीकडे दिव्याकडेही सर्व पक्षांचे लक्ष लागले आहे.