विक्रमगडमध्ये सूर्यफुलाचे वाढते उत्पन्न
By Admin | Published: March 12, 2016 01:52 AM2016-03-12T01:52:10+5:302016-03-12T01:52:10+5:30
विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीची मदार प्रामुख्याने पावसाळी भातशेतीवरच. मात्र गेल्या काही वर्षापासुन दुबार पिक घेण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे़
तलवाडा: विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीची मदार प्रामुख्याने पावसाळी भातशेतीवरच. मात्र गेल्या काही वर्षापासुन दुबार पिक घेण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे़ त्यात प्रामुख्याने पावसाळयात भात तर उन्हाळयांत भाजीपाला लागवड होत आहे. परंतु ग्रामीण भागातील अल्पशती असणारे शेतकरी सुर्य फुल या खाद्यतेलाच्या पिकांची लागवड मोठया प्रमाणात करीत आहेत़ परंतु आता त्यामध्येही बदल होऊन एकमेकांनी केलेले शेतामधील प्रयोग व त्यापासुन मिळणारा नफा पाहाता आता सध्या येथील शेतकरी जागृत होऊ लागले आहे़
येथील शेतकरी प्रामुख्याने पावसाळी भात लागवड तर उन्हाळी कलिंगड, काकडी, भेंडी, चवळी, मिरची, अशा प्रकारची पिके घेतली जातात़ मात्र, गेल्या काही वर्षापासुन तालुक्यात सुर्यफुल या खाद्यतेल देणाऱ्या पिकाची लागवड शेतकरी उन्हांळी हंगामात मोठया प्रमाणात घेऊ लागले आहेत. यावर्षी तालुक्यात उन्हाळी हंगामात ३६० हुन अधिक हेक्टरवर भाजीपाला लागवड करण्यांत आलेली आहे़. तर तालुक्यात यंदा अंदाजे आकडेवारीनुसार ४० ते ५० हेक्टरवर सुर्यफुलाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे़ तर गेल्या वर्षीही अंदाजीत ४० हेक्टरवर ही लागवड करण्यात आली होती.
सुर्यफुल हे पिक अल्पशा खर्चात मोठे उत्पन्न देणारे पिक आहे़ या पिकाच्या लागवडीचा खर्च व मजुरांची गरज सुध्दा कमी प्रमाणात लागते़ त्यामुळे या पिकांपाासुन थोडी मेहनत घेतल्यास मोठे उत्पन्न मिळते़ या पाश्वभुमीवर विक्रमगड तालुक्यातील माण व ओंदे गावातील काही शेतकऱ्यांनी आपल्या शेती खाचरांवर आपल्या कुटुंबाच्या मदतीने सुर्यफुलाची लागवड केली आहे.
या लागवडीकरीता बीयाणे, खत, मजुरी, ट्ॅक्टर असा मिळून अल्प खर्च येतो. लागवडीनंतर फक्त ८ दिवसांतुन ऐकदा पाण्याची पाळी दयावी लागते़ तर ऐकदा खत घालावे लागते़ या पिकावर कुठल्याही प्रकारचा रोग येत नसल्याचे शेतकऱ्यांकडुन सांगण्यात येते़ तसेच एक ते दोन मजुर सर्व पिकाची लागवड तसेच देखभाल करु शकतात,त्यामुळे या पिकाला मजुरांचा खर्च व इतर लागणारा खर्च मोठया प्रमाणात शेतकऱ्यांचा वाचतो़वर्ष २०१६: यंदाच्या वर्षी माण येथील कृषीमधून पदवीधर झालेले शेतकरी विलास लडकू पाडवी यांनी चार एकरमध्ये सुर्यफुलाची लागवड केली आहे़ तसेच त्याबरोबरच इतर पिके एक एकरमध्ये काकडी, एक एकरमध्ये मोगरा अर्धा एकरमध्ये कांदा अशी लागवड केली आहे़ ४बाजारात सुर्यफलाच्या १५ किलो डब्याचा दर १६०० रुपये तर काकाड १९ किलो, मोगरा १२० किलो याप्रमाणे उत्पादीत मालाला भाव भाग मिळत आहे़
४गत वर्षी ओंदे येथील शेतकरी हेमंत ठाकरे यांनी एक एकरमध्ये सुर्यफुलाची लागवड करुन अल्पखर्चात नऊ डबे खाद्य तेल मिळाले.विक्रमगड तालुक्यातील हवामान हे उष्ण व दमट असुन, जमीन मध्यम ते खोल स्वरुपाची व योग्य पाण्याचा निचरा होणारी आहे़ सुर्यफुल पिकास हवामान व जमीन योग्य असल्याने शेतकऱ्यांना फायदा होवु शकतो़
- विश्वनाथ पाटील, शेतकरी
व कुणबीसेना प्रमुख, विक्रमगड